Prasad Lad on Nanar Refinery Project: “शिवसेनेची दुटप्पी भूमिका, नाणार प्रकल्प होण्यासाठी भाजप प्रयत्न करणार”: प्रसाद लाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 14:21 IST2022-04-07T14:19:52+5:302022-04-07T14:21:19+5:30

शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नेतेही आमच्या संपर्कात असल्याचा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे.

prasad lad criticised shiv sena and said bjp trying for nanar refinery project | Prasad Lad on Nanar Refinery Project: “शिवसेनेची दुटप्पी भूमिका, नाणार प्रकल्प होण्यासाठी भाजप प्रयत्न करणार”: प्रसाद लाड

Prasad Lad on Nanar Refinery Project: “शिवसेनेची दुटप्पी भूमिका, नाणार प्रकल्प होण्यासाठी भाजप प्रयत्न करणार”: प्रसाद लाड

गेल्या काही दिवसांपासून नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पावरून (Nanar Refinery Project)  पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागल्याचे दिसत आहे. तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणातच होणार असल्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. यासाठी तीन गावांची चाचपणी करण्यात आली. मात्र, तीनही गावांच्या ग्रामस्थांनी याला विरोध केल्याचे सांगितले जात आहे. अशातच आता भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी याबाबत प्रतिक्रिया देत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

आधी विरोध करायचा नंतर साटंलोटं करायचं ही शिवसेनेची भूमिका यापूर्वीही राहिली आहे. नाणार येथे झालेल्या जमिन खरेदी, कुणी किती रूपयांना खरेदी केली, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत नाणार प्रकल्प झाला पाहिजे ही भाजपची भूमिका आहे. त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले. 

शरद पवार-पंतप्रधान भेट गांभीर्याने घेण्याची गरज नाही

राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली, त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. भाजप राष्ट्रवादीसोबत कदापी जाणार नाही. पवार ज्येष्ठ नेते आहेत, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी पवारांना भेटू शकतात, असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. संजय राऊतांची मनोवृती बिघडली आहे. त्यांना गेट वेल सुन सांगावे लागेल. किरीट सोमय्यांनी संजय राऊतांना काय ते उत्तर दिले आहे. किरीट सोमय्यांना फसवण्याचे काम राऊत आणि गँग करत आहे. आम्ही त्याला भीक घालत नाही. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे, या शब्दांत प्रसाद लाड यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. यासंदर्भात टीव्ही९ने वृत्त दिले आहे. 

दरम्यान, कोकणातील पाच विभागातील शिवसेनेतील नाराज कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत. २०२४ मध्ये भाजपचे १० ते ११ आमदार निवडून येतील. तर २ खासदार भाजपचे असतील, असा विश्वास व्यक्त करत शिवसेनेतील नाराजी, हिंदुत्वाचा मुद्दा सोडणे, कामे न होणे याबाबत शिवसेनेतील नेते नाराज आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नेतेही आमच्या संपर्कात असल्याचा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे. 

 

Web Title: prasad lad criticised shiv sena and said bjp trying for nanar refinery project