जखमी घुबडाचे वाचवले प्राण
By Admin | Updated: November 3, 2016 03:15 IST2016-11-03T03:15:51+5:302016-11-03T03:15:51+5:30
तालुक्यातील कोचाळे गावा लगतच्या जंगलात जख्मी अवस्थेत आढळलेल्या घुबडाला कैलास फसाळे या आदिवासी युवकाने जीवदान देऊन प्राण वाचवले आहे.

जखमी घुबडाचे वाचवले प्राण
रविंद्र साळवे,
मोखाडा- तालुक्यातील कोचाळे गावा लगतच्या जंगलात जख्मी अवस्थेत आढळलेल्या घुबडाला कैलास फसाळे या आदिवासी युवकाने जीवदान देऊन प्राण वाचवले आहे.
एकीकडे पक्ष्यांची होणारी शिकारी व हत्या यामुळे पक्षाच्या अनेक जाती नष्ट होत असताना या युवकाने या पक्ष्याचे प्राण वाचून नवा आदर्श निर्माण करून दिला आहे. कोचाळे गावालगतच्या जंगलात हे घुबड आढळून आले होते. कामानिमित्ताने फसाळे जंगलात गेले असता त्यांना डोळ्याला जखम झालेले घुबड दिसले आणि त्यांनी ते घरी आणून याची माहिती प्रा शिंगवे यांना दिली त्यानंतर त्यांनी पक्षी अभ्यासक सुनील लाड आणि डॉ रिना देव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घुबडावर उपचार करण्याचा सल्ला दिला त्यानुसार वनअधिकारी डिंगोरे आणि झुगारे याच्याकडे ते दिले त्यांनी त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नेऊन त्याच्यावर उपचार के ले.