प्रकाश मेहतांची पत्रकारांना दमदाटी
By Admin | Updated: August 5, 2016 05:15 IST2016-08-05T05:15:55+5:302016-08-05T05:15:55+5:30
महाडनजीकच्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी गेलेले गृहनिर्माणमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी गुरुवारी पत्रकारांना दमदाटी केली.

प्रकाश मेहतांची पत्रकारांना दमदाटी
मुंबई : महाडनजीकच्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी गेलेले गृहनिर्माणमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी गुरुवारी पत्रकारांना दमदाटी केली. या दुर्घटनेकडे पालकमंत्री या नात्याने आपण तेवढे गांभीर्याने पाहिलेले नाही, असा आरोप होत आहे याबाबत आपले म्हणणे काय, असे एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने विचारले असता मेहता भडकले. तुम्ही दंडुके घेऊन येता आणि काहीही विचारता. माझ्याबद्दल माझा पक्ष बघून घेईल, असे ते म्हणाले.
त्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते आणि पत्रकारांमध्ये बाचाबाची झाली तेव्हा पत्रकारांना हाणा, असे मेहता म्हणाल्याचा आरोप आहे. या घटनेचे तीव्र पडसाद विधिमंडळात उमटले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मेहतांच्या राजीनाम्याची मागणी विधानपरिषदेत केली तर विधानसभेत हीच मागणी काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)