जीवन साधना गौरव पुरस्काराने प्रकाश आमटे सन्मानित

By Admin | Updated: October 3, 2016 05:00 IST2016-10-03T05:00:09+5:302016-10-03T05:00:09+5:30

पाचव्या वर्धापन दिन सोहळ्यात रविवारी सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना जीवन साधना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

Prakash Amte honored at the Life Sadhana Gaurav Award | जीवन साधना गौरव पुरस्काराने प्रकाश आमटे सन्मानित

जीवन साधना गौरव पुरस्काराने प्रकाश आमटे सन्मानित


गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या पाचव्या वर्धापन दिन सोहळ्यात रविवारी सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना जीवन साधना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर होते. विशेष अतिथी म्हणून पदवीधर मतदार संघ नागपूरचे आ. प्रा. अनिल सोले तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मंदाकिनी आमटे व अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आ. प्रा. अनिल सोले व कुलगुरू डॉ. कल्याणकर यांच्या हस्ते डॉ. प्रकाश आमटे यांना जीवन साधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, शिल्ड व रोख रक्कम देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. आमच्या आयुष्याचा परिणाम समाजावर झाला, हे दिसून येते. प्रत्येकांनी समाजसेवेच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Prakash Amte honored at the Life Sadhana Gaurav Award