शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सुपारी घेऊन मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा; प्रकाश आंबेडकरांचा जाहीर आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 15:55 IST

भारिपचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावरील ट्रोलर्सना रोखठोक इशारा दिला आहे.

ठळक मुद्देभारिपचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा सोशल मीडियावरील ट्रोलर्सना रोखठोक इशारा मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा. सुपारी घेऊन ट्रोलिंग करणाऱ्यांना माझे कार्यकर्तेच बघून घेतील हुकूमशहाबरोबर लढण्यासाठी काही गोष्टी हुकूमशहासारख्या कराव्या लागतात

अकोला - भारिपचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावरील ट्रोलर्सना रोखठोक इशारा दिला आहे. मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा. सुपारी घेऊन ट्रोलिंग करणाऱ्यांना माझे कार्यकर्तेच बघून घेतील, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. अकोला येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आंबेडकर यांनी हा इशार दिला आहे. ते म्हणाले की, ''प्रसारमाध्यमांमधून माझ्यावर टीका करणाऱ्यांवर माझा राग नाही. मात्र राजकीय पार्श्वभूमी असलेल्यांबद्दल आता माझी हीच भूमिका असणार आहे. कुणाकडून तरी सुपारी घेऊन टीका करणाऱ्यांना ठोकून काढा. अशा लोकांना आता माझे कार्यकर्तेच बघून घेतील,'' असा इशाराच प्रकाश आंबेडकर यांनी दिला. ''आमची लढाई मोठ्या हुकूमशहाविरुद्ध आहे. त्यामुळे हुकूमशहाबरोबर लढण्यासाठी काही गोष्टी हुकूमशहासारख्या कराव्या लागतात,"असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भारतीय हवाई दलाने केलेल्या एअरस्ट्राइकचे पुरावेही देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. नेमकं काय करायचंय याचा उद्देशही स्पष्टपणे केंद्र सरकारकडे नव्हता. केवळ, आम्ही हल्ला करतो हेच दाखवायचा प्रयत्न असेल तर त्याची गरज नव्हती. कारण, यापूर्वीही ते दाखवून दिलंय, असे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. तसेच या एअर स्ट्राईकचे पुरावे द्या, फोटोग्राफ रिलीज करा, अशी मागणीही आंबेडकर यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेत केली.  बालाकोटमधील हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येबाबत टिप्पणी करतांना हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांच्या वक्तव्याचा दाखल आंबेडकर यांनी दिला. अशा हवाई हल्ल्यांमध्ये किती जण मृत्युमुखी पडले, याची मोजदाद भारतीय हवाई दल करीत नाही, असे विधान एअर मार्शल धनोआ यांनी केले. हे विधान म्हणजे केंद्र सरकारला जबाबदारीची जाणीव करून देणारे आहे. वायुसेनेने आपले काम केले, आता सरकारने या हल्यासंदर्भात जबाबदारीने पुरावे देण्याची गरज आहे, असे आंबेडकर यांनी म्हटलं आहे.   

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSocial Mediaसोशल मीडियाPoliticsराजकारण