शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, राष्ट्रवादीचं जागावाटप पूर्ण; आमच्याशी बोलणी म्हणजे निव्वळ फार्स- आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 15:07 IST

प्रकाश आंबेडकर यांचं काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीकास्त्र

मुंबई: भाजपाविरोधात महाआघाडी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सुरू असलेला हा आघाडीचा प्रयत्न म्हणजे निव्वळ फार्स असल्याचं टीकास्त्र भारिपा बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोडलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं लोकसभेचं जागावाटप पूर्ण झालं आहे. त्यामुळे आम्हाला आघाडीत घेण्यासाठी त्यांच्याकडून सुरू असलेला प्रयत्न हा निव्वळ दिखावा असल्याचं आंबेडकर म्हणाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे. धर्मनिरपेक्ष मतांची फाटाफूट टाळण्यासाठी प्रकाश आंबेडकरांच्या भारिपा बहुजन महासंघाला महाआघाडीत घेण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. मात्र यावर आंबेडकरांनी जोरदार टीका केली आहे. 'काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं लोकसभा निवडणुकीचं जागावाटप जवळपास पूर्ण झालं. त्यामुळे भारिपा बहुजन महासंघाला महाआघाडीत घेण्याबद्दलची चर्चा म्हणजे केवळ फार्स आहे,' अशा शब्दांमध्ये आंबेडकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला लक्ष्य केलं. भारिपा बहुजन महासंघाला महाआघाडीत घेण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भारिपा बहुजन महासंघानं एमआयएमसोबत आघाडी केली आहे. मात्र भारिपा बहुजन महासंघाला महाआघाडीत यायचं असल्यास त्यांनी एमआयएमची साथ सोडावी, अशी काँग्रेस, राष्ट्रवादीची अट आहे. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनीदेखील प्रयत्न केले होते. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९