शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव-भीमा प्रकरण: प्रकाश आंबेडकरांमुळे महाराष्ट्र पेटला; संभाजी भिडेंचा थेट आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 11:55 IST

भीमा-कोरेगाव दंगलींचा वापर राजकीय स्वार्थीसाठी आणि मतांसाठी करण्यात आला.

सांगली: कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावर हल्ला चढवला. कोरेगाव-भीमा येथील दंगलीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील वातावरण पेटवले, असा थेट आरोपही त्यांनी केला. कोरेगाव-भीमा दंगलीनंतर एकबोट आणि मला अटक करण्याची मागणी केली जात आहे. हा म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे. मुळात या सगळ्या दंगलीची सूत्रधार ही एल्गार परिषद आहे. एल्गार परिषदेकडून शनिवारवाड्यासमोर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उमर खालिदला आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा हेतू मुळात कोरेगाव-भीमामध्ये दंगल घडवणे, हाच होता. त्यामुळे सरकारने एल्गार परिषदेच्या नेत्यांना ताब्यात घ्यावे, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली. 

कोरेगाव भीमा ‘बंद’मधील गुन्हे सरकार मागे घेणार, १३ कोटींची नुकसानभरपाईतसेच सध्या माझ्यावर आरोप होत असताना सर्वच राजकीय पक्ष राजकीय स्वार्थासाठी गप्प बसले आहेत. निवडणुका जवळ आल्यामुळे दलितांना खुश ठेवता यावे, त्यांची मते मिळावीत, यासाठी राजकीय पक्षांकडून कोरेगाव-भीमा प्रकरणाचा वापर सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांनीदेखील माझ्यावर तारतम्य सोडून आरोप केले. एखाद्या लहान मुलाला चॉकलेट देऊन त्याला पढवून बोलायला लावले जाते, तसे प्रकाश आंबेडकरांचे वर्तन आहे. मी गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये कोरेगाव-भीमा परिसरात फिरकलेलो नाही. त्यामुळे मला अटक करून काय साध्य होणार? परंतु, प्रकाश आंबेडकरांना माझ्या अटकेची मागणी करून आपण सत्याचा पुरस्कार करतोय, असे वाटत आहे. सर्वप्रथम आंबेडकर यांनी कोरेगाव-भीमा दंगलीच्यावेळी त्याठिकाणी होते, ही माहिती कोणी दिली, त्यांची नावे उघड करावीत. सरकारनेही त्यांची चौकशी करावी, असे संभाजी भिडे यांनी म्हटले. 

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBhima-koregaonभीमा-कोरेगाव