जलयुक्त शिवारचे सभापतींकडून कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2017 02:56 IST2017-06-10T02:56:52+5:302017-06-10T02:56:52+5:30

राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेवर विरोधकांकडून टीका होत असताना विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर

Praise by the Chairman of Water Commission | जलयुक्त शिवारचे सभापतींकडून कौतुक

जलयुक्त शिवारचे सभापतींकडून कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेवर विरोधकांकडून टीका होत असताना विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी या योजनेचे कौतुक केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच सुखावले.
अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत प्राध्यापक रिचर्ड वर्मा आणि जॉर्जटाऊन विश्व विद्यालयाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी विधान भवनास भेट दिली. राज्य विधिमंडळाचे कामकाज कसे चालते याबाबत विद्यार्थ्यांनी या वेळी माहिती घेतली. या भेटीदरम्यान सभापती निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पाण्याच्या योग्य वापराबाबत प्रबोधन करण्याचे काम शासन करीत आहे. जलयुक्त शिवारसारख्या उपयुक्त योजना शासन राबवित असल्याचे सांगून याची माहितीही त्यांनी दिली.

Web Title: Praise by the Chairman of Water Commission