प्रभातने पार केली कॅलिफोर्नियातील खाडी
By Admin | Updated: August 15, 2016 03:42 IST2016-08-15T03:42:09+5:302016-08-15T03:42:09+5:30
प्रभात कोळी (१७) या जलतरणपटूने ८ आॅगस्ट रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील कॅटलीना खाडी अवघ्या १०.३० तासांत पूर्ण केली.

प्रभातने पार केली कॅलिफोर्नियातील खाडी
वैभव गायकर,
पनवेल- नेरूळ येथील प्रभात कोळी (१७) या जलतरणपटूने ८ आॅगस्ट रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील कॅटलीना खाडी अवघ्या १०.३० तासांत पूर्ण केली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रभातने भारत देशाचा झेंडा अमेरिकेत रोवल्याने त्याचे सर्वत्र स्तरावर कौतुक होत आहे.
अणुशक्तीनगर येथे शिकणारा प्रभातचे हे तिसरे आंतरराष्ट्रीय यश आहे. या आधी त्याने युरोप आणि दक्षिण आफ्रिकेची मोहीम यशस्वी केली आहे. प्रभात रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोटर््स कॉम्लेक्स येथे दररोज ८ तास जलतरणाचा सराव करीत होता. चार महिन्यांपासून करीत असलेल्या त्याच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रभात कोळीला सुरुवातीला व्हिसा नाकारला होता तरीही त्याने सातत्य कायम ठेवले, अखेर त्याला व त्याच्या आईला व्हिसा मिळाला.
>प्रभातने सातासमुद्रापार कामगिरी करावी, असे त्याच्या वडिलांचे स्वप्न आहे. त्याचे भविष्य उज्ज्वल असून त्यासाठी मेहनतीची त्याची तयारी आहे.
- सॅली मिंट्री, प्रशिक्षक, जर्सी