कुर्ल्यात रेस्टॉरंटमध्ये भीषण सिलिंडर स्फोट, ८ ठार

By Admin | Updated: October 16, 2015 18:12 IST2015-10-16T15:12:57+5:302015-10-16T18:12:20+5:30

कुर्ल्यातील सिटी किनारा या रेस्टॉरंटमध्ये झालेल्या भीषण सिलिंडर स्फोटात ८ नागरिक ठार झाले आहेत

A powerful cylinder explosion in the restaurant of Kirla, 8 dead | कुर्ल्यात रेस्टॉरंटमध्ये भीषण सिलिंडर स्फोट, ८ ठार

कुर्ल्यात रेस्टॉरंटमध्ये भीषण सिलिंडर स्फोट, ८ ठार

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - कुर्ल्यातील सिटी किनारा या रेस्टॉरंटमध्ये झालेल्या भीषण सिलिंडर स्फोटात ८ नागरिक ठार झाले आहेत. कुर्ला पश्चिम येथे होलीक्रॉस हॉस्पिटलजवळ असलेल्या सिटीकिनारा रेस्टॉरंटमध्ये आज दुपारी सिलिंडरचा स्फोट झाला, त्यात ७ पुरुषांसह १ महिला जखमी झाली, त्यांना उपचारांसाठी ताताडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.  
हे हॉटेल दुमजली असून खालच्या मज्यावर किचन तर वरती जेवणाची सोय आहे. दुपारी गॅस लीक झाल्यामुळे हा स्फोट झाल्याची माहिती मिळत असून अपु-या जागेमुळे ग्राहकांना लवकर हॉटेलबाहेर पडता आले नाही व त्यांना जीव गमवावा लागला असे समजते.

 

Web Title: A powerful cylinder explosion in the restaurant of Kirla, 8 dead