शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ऊर्जामंत्र्यांच्याच शहरातील वीज वितरण अदानी पॉवरकडे; १० शहरांवर कंपनीची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 11:03 IST

डिसेंबर २०२१ मध्ये समूहाने शहरातील वीज यंत्रणेचे प्राथमिक सर्वेक्षण केले व १२-१३ फेब्रुवारी रोजी कंपनीच्या सात सदस्यीय चमूने आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखतीदेखील घेतल्या.

नागपूर : येत्या काही महिन्यांत नागपुरातील वीज वितरणाची प्रणाली महावितरणऐवजी अदानी पॉवरच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे. ऊर्जा मंत्रालयाने राज्यातील सोळा शहरांचे वीज वितरण खासगी परवानाधारकांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी पॉवरची नजर नागपूरसह इतर दहा शहरांवर आहे. 

डिसेंबर २०२१ मध्ये समूहाने शहरातील वीज यंत्रणेचे प्राथमिक सर्वेक्षण केले व १२-१३ फेब्रुवारी रोजी कंपनीच्या सात सदस्यीय चमूने आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखतीदेखील घेतल्या. सोमवारी अदानीच्या अधिकाऱ्यांनी महावितरणच्या कॉंग्रेस नगर विभागाचेदेखील सर्वेक्षण केले. संबंधित यंत्रणा अदानी ट्रान्समिशनकडून ताब्यात घेण्यात येणार असून ही सूचीबद्ध कंपनी आहे. ‘सेबी’च्या नियमांमुळे आम्ही प्रत्यक्ष सूत्रे हाती घेण्याअगोदर काहीही उघड करू शकत नाही, असे अदानी पॉवरमधील सूत्रांनी स्पष्ट केले. कर्मचारी संपावर जातील व काही महिन्यांनंतर महावितरण दिसणार नाही, हे लक्षात आल्यावर अनेक ग्राहक देयक भरणे बंद करतील. यामुळेच कंपनीने याबाबत गुप्तता पाळली असल्याची माहिती महावितरणमधील सूत्रांनी दिली आहे. महावितरणला २८ फेब्रुवारीपर्यंत १० हजार ६०० कोटी रुपये भरायचे आहेत आणि ते भरण्याच्या स्थितीत नाहीत. 

व्यवसाय विकून महसूल मिळवणे हाच पर्यायमहावितरण आर्थिक संकटात सापडले असून ग्राहकांची थकबाकी ७२ हजार कोटींच्या पुढे गेली. वसुली आणि वीजचोरीविरोधी मोहिमेचा फारसा फायदा झालेला नाही. अदानी समूहाला पैसे द्यावेच लागणार आहेत, पण केंद्र सरकारने बँकांना १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज देऊ नये, असे सांगून ही बाब अवघड केली आहे. कंपनीने ४५ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, त्यातील १३ हजार कोटी रुपये अद्याप भरलेले नाहीत. आता मोठ्या शहरांमध्ये व्यवसाय विकून महसूल मिळवणे हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर आहे.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतAdaniअदानी