शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

एमपीएससी सदस्यांची पदे ३१ जुलैपर्यंत भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 06:41 IST

स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी लावून धरला. त्यावर अजित पवार म्हणाले,  लोणकर कुटुंबीयांवर ओढवलेले दु:ख मोठे असून, राज्य सरकार लोणकर कुटुंबियांच्या दु:खात सामील असल्याचे सांगितले.

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सदस्यांच्या सर्व जागा येत्या ३१ जुलैपर्यंत भरण्यात येतील. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीच्या विलंबामुळे पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने केलेली आत्महत्या क्लेशदायक असून अशा घटना टाळण्यासाठी भरती प्रक्रियेची सक्षम व गतिमान व्यवस्था उभी केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी लावून धरला. त्यावर अजित पवार म्हणाले,  लोणकर कुटुंबीयांवर ओढवलेले दु:ख मोठे असून, राज्य सरकार लोणकर कुटुंबियांच्या दु:खात सामील असल्याचे सांगितले. लोणकर कुटुंबीयांना मदत देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीला झालेला विलंब हा न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निर्णय आणि कोरोना महामारीची परिस्थितीमुळे झाल्याचे सांगून कुठल्याही विद्यार्थ्यांने नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रश्नात स्वत: लक्ष घालत असून एमपीएससीच्या परीक्षार्थींच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात एमपीएससीचे अध्यक्ष आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून भरती प्रक्रिया गतिमान करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस आदी महत्त्वाच्या विभागांमध्ये सर्व पदांची भरतीप्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली.

मराठा आरक्षणासाठी मर्यादा शिथिल करामराठा समाजाला एसईबीसीतून आरक्षण देण्यामधील ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करण्यासाठी संविधानात योग्य सुधारणा करून मर्यादा शिथिल करण्याची शिफारस करणारा ठराव दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाला. सार्वजनिक बांधकाम मंत्री अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हा ठराव मांडला.

ओबीसींचा इम्पिरिकल डाटा केंद्राने द्यावा  स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण पुन्हा बहाल करण्यासाठी आवश्यक असलेला ओबीसींचा इम्पिरिकल डाटा केंद्राने महाराष्ट्राला तत्काळ उपलब्ध करून द्यावा, असा ठराव दोन्ही सभागृहांमध्ये सोमवारी करण्यात आला. मात्र, यावेळी मंत्री भुजबळ आणि फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवनNCPराष्ट्रवादी काँग्रेस