शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'स्थगिती सरकारप्रमुखांनी भूमिपूजन केलेल्या प्रकल्पांनाच स्थगिती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 06:48 IST

भाजपची शिवसेनेवर टीका; राज्यव्यापी आंदोलनात स्थानिक प्रश्नही घेणार

ठाणे : सायन्स पार्क आणि अर्बन फॉरेस्ट या दोन प्रकल्पांना गुरुवारी झालेल्या महासभेत स्थगिती दिल्यानंतर भाजपला सत्ताधारी शिवसेनेवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. दस्तुरखुद्द स्थगिती सरकारचे प्रमुख अर्थात मुख्यमंत्र्यांनीच भूमिपूजन केलेल्या प्रकल्पांना शिवसेनेकडून स्थगिती कशी काय दिली जाते, असा प्रश्न ठाणे शहर भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी शनिवारी केला.दोन्ही प्रकल्पांना स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांचा सुरु वातीपासूनच विरोध होता. तरीदेखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. या ठिकाणी खेळाचे मैदान विकसित करण्याचा त्यांचा प्रस्ताव होता. गुरु वारच्या महासभेतदेखील त्यांनी या प्रकल्पाला विरोध केल्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी या दोन्ही प्रकल्पांना स्थगिती दिली. परस्परविरोधी निर्णयामुळे शिवसेनेच्या भूमिकेवरच संशय निर्माण झाल्याचे डावखरे म्हणाले.गावठाण, कोळीवाड्यांच्या समस्या मांडणारराज्यातील विविध प्रश्नांवर २५ फेब्रुवारीला भाजपा राज्यव्यापी आंदोलन छेडणार असले, तरी यामध्ये ठाणे महापालिकेतील स्थानिक प्रश्नांवरदेखील निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती डावखरे यांनी दिली. क्लस्टरमध्ये गावठाण, कोळीवाडे वगळणे, दिवा डम्पिंग प्रश्न, पाणीप्रश्न अशा अनेक मुद्यांवर निदर्शने करणार आहे.राज्याच्या प्रश्नांनावर जसे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे ठाण्याच्या प्रश्नांवरदेखील ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जेणेकरून येथील समस्यांवर उपाययोजना करता येणार आहेत.करमाफीची घोषणादेखील फसवी : शिवसेनेने पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वी ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी देण्याची घोषणा केली होती. मुंबई महापालिकेत या घोषणेची अंमलबजावणी झाली असली, तरी ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेने मात्र ठाणेकरांची फसवणूक केली असल्याची टीकाही त्यांनी केली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यत्वेकरून क्लस्टरच्या भूमिपूजनासाठी आले होते. या मुख्य कार्यक्र मात हे दोन कार्यक्रम प्रशासनाने घुसवले. या प्रकल्पाला संजय भोईर आणि इतर स्थानिक नगरसेवकांचा विरोध होता. त्यासंदर्भात सभागृहात भोईर आणि नजीब मुल्ला यांनी गंभीर आरोप केले. एका विकासकासाठी ते केले असून त्याला टीडीआरदेखील दिल्याचा आरोप त्यांनी केल्याने प्रशासनाकडून यासंदर्भात मी स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, ते अद्याप दिलेले नाही. त्यामुळे जोपर्यंत ते येत नाही, तोपर्यंत या प्रकल्पासंदर्भात कोणत्याही प्रकारची कार्यवाही करू नये, असे आदेश मी सभागृहात दिले आहेत. ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी दिली जाईल.- नरेश म्हस्के, महापौर, ठामपा

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNiranjan Davkhareनिरंजन डावखरे