मुंबई: कोरोनाची देशातील परिस्थिती पाहता व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन / प्रत्यक्ष सर्व परीक्षा तसेच या संबंधित प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करणारे पत्र युवासेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. कोरोनाची सध्यपरिस्थिती पाहता आपण स्वतः यामध्ये लक्ष घालून देशातील विद्यार्थ्यांच्या होताच निर्णय घ्यावा असे त्यांनी पत्राद्वारे नमूद केले आहे. दरम्यान शैक्षणिक वर्षाची सुरुवात जून ते मे करण्याऐवजी जानेवारी ते डिसेंबर अशी रचना आपण करू शकतो हे देखील त्यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
अव्यवसायिक अभ्यासक्रमाचे बरेचसे मूल्यमापन पूर्ण झाले असून अंतिम परीक्षांचे मूल्यमामापनातील महत्त्व १० टक्क्यांहून जास्त असणार नाही. त्यामुळे विद्यापीठांनी ठरविलेल्या गुणपद्धतीप्रमाणे त्यांचा निकाल लावला जाऊ शकतो असे त्यांनी सादर पत्रात म्हटले आहे. यामुळे आपण भविष्यातील कोरोनाच्या मोठ्या प्रमाणावरील संसर्गाला आळा घालण्याचा प्रयत्न करू शकतो असे ही त्यांनी नमूद केले आहे.
Read in English
वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!
Web Title: Postpone professional course exams and entrance exams Aaditya Thackeray writes to pm modi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.