खारघर दुर्घटनेतील १२ मृतांचे पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर; मृत्यूचं कारण स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 23:17 IST2023-04-20T23:17:27+5:302023-04-20T23:17:44+5:30
मृत्यूमुखी पडलेल्या १४ पैकी १२ जणांच्या पोटात अन्नाचा एक कणही नसल्याचं अहवालात समोर आलं आहे.

खारघर दुर्घटनेतील १२ मृतांचे पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर; मृत्यूचं कारण स्पष्ट
वैभव गायकर
पनवेल - खारघर महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात १४ श्रीसदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालात या मृतांच्या मृत्यूचे कारण समोर आले असून डिहायड्रेशनमुळे (जलशुष्कता) बऱ्याच श्री सदस्यांचा मृत्यू झाल्याचे शव विच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे.
मृत्यूमुखी पडलेल्या १४ पैकी १२ जणांच्या पोटात अन्नाचा एक कणही नसल्याचं अहवालात समोर आलं आहे. अर्थात, मृत्यूपूर्वी किमान ६ ते ७ तास त्यांनी काहीही खाल्लेलं नव्हतं. इतर दोघांच्या रिपोर्टनुसार त्यांनी काही खाल्लं होतं किंवा नाही यासंदर्भात स्पष्टता येऊ शकलेली नाही. शिवाय, त्यांनी पाणीही अत्यंत कमी किंवा अजिबात न प्यायल्याचंही अहवालातून स्पष्ट झालं आहे. डिहायड्रेशनमुळे किडनी निकामी होत असते. शरीरातील इतरही अवयवावर त्याचा परिणाम होत असल्याची माहिती डॉ बी एम काळेल यांनी दिली.
कार्यक्रमस्थळी कडक उन्हात आणि उकाड्यात असल्याने अनेकांना पाणी मिळाले नसल्याने शरीरात पाण्याची पातळी वेगाने कमी झाल्याने अनेकांना याचा त्रास झाला.