शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एल निनो सक्रिय झाल्याने मान्सूनवर विपरित परिणामाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 15:38 IST

जेव्हा समुद्राचे तापमान सरासरीपेक्षा अर्ध्या अंशाने वाढते़ तेव्हा सौम्य एल निनो निर्माण झाला असे म्हटले जाते़.

ठळक मुद्दे जेव्हा समुद्राचे तापमान सरासरीपेक्षा अर्ध्या अंशाने वाढते़ तेव्हा सौम्य एल निनो निर्माण झाला असे म्हटले जाते़

पुणे :  प्रशांत महासागरातील एल निनो हा पुन्हा एकदा सक्रिय झाला असून तेथील पाण्याचे तापमान वाढत आहे़. त्याचा परिणाम आगामी मान्सूनवर होण्याची शक्यता असून यंदा मान्सून कमी बरसण्याची शक्यता असल्या अंदाज अमेरिकन हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. गेल्या वर्षी भारतीय हवामान खात्यात मान्सून सरासरीच्या ९७ टक्के होईल, असा अंदाज व्यक्त केला होता़. प्रत्यक्षात तो ९१ टक्के झाला असून आवर्षण प्रवण भागात तसेच मध्य भारतात त्यामुळे दुष्काळ पडला आहे़ .याबाबत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ़. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, ज्या ज्यावेळी एल निनो सक्रिय होतो़. त्यावेळी दीर्घकालीन काळात मान्सूनवर परिणाम झालेला दिसून आला आहे़. भारतीय हवामान विभाग ज्या मॉडेलच्या आधारे मान्सूनचा अंदाज व्यक्त करत असते़ त्यातील सहा प्रमुख घटकांपैकी एल निनोची स्थिती हा एक महत्वाचा घटक आहे़. याशिवाय अन्य घटकांची स्थिती कशी आहे़. यावरही मॉन्सून किती बरसणार हे पाहणे महत्वाचे असते़ एल निनो सक्रिय असलेली २५ वर्षे पाहिली असता त्यात जास्त वेळा मान्सून कमी झाल्याचे पाहायला मिळते़. त्यामुळे एल निनो सक्रीय असेल तर मॉन्सूनवर विपरित परिणाम होणार असल्याचे संकेत मिळतात़ त्याचवेळी काही वर्षी एल निनो सक्रिय असतानाही चांगला मॉन्सून झाला आहे़. एल निनोशिवाय अन्य घटक हिंदी महासागरातील पाण्याचे तापमान अनुकुल असेल तर तो घटक अधिक प्रभावी ठरुन मान्सून चांगला झालेला पहायला मिळालेला आहे़. त्यामुळे अन्य घटक किती प्रभावी आहेत़ याचा अभ्यास केल्यानंतरच मॉन्सून किती होईल याचा अंदाज व्यक्त करणे शक्य होणार आहे़. भारतीय हवामान विभागाच्या पुढाकाराने आशियाई देशातील शास्त्रज्ञांनाची परिषद एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होईल़. त्यात आतापर्यंत घेतलेल्या निरीक्षणाचा अभ्यास करुन आगामी मान्सून कसा असेल, याचा अंदाज जाहीर केला जातो़. ़़़़़़़काय आहे एल निनोदक्षिण अमेरिकेत पेरु देश आहे़. त्याच्या किनाऱ्याच्या पश्चिमेकडे जो प्रशांत महासागर आहे़. त्याचे तापमान सरासरीपेक्षा वाढते़. ही तापमान वाढ हळूहळू प्रशांत महासागराच्या बऱ्याच मोठ्या भागावर पसरते़ . जेव्हा समुद्राचे तापमान सरासरीपेक्षा अर्ध्या अंशाने वाढते़ तेव्हा सौम्य एल निनो निर्माण झाला असे म्हटले जाते़. तापमान वाढ दोन अंशाहून जास्त झाली तर त्याला अतितीव्र एल-निनो म्हणतात. मध्यंतरीच्या एल-निनोच्या अवस्थेतला मध्यम किंवा तीव्र गणले जाते. एल-निनो प्रबळ होतो. तो वर्षाअखेरीस, किंवा ख्रिसमसच्या सुमारास, त्यावरुन त्याला एल निनो हे  नाव पडले आहे़. पण त्याच्या बऱ्याच आधी म्हणजे मे-जून महिन्यात त्याचे वेध लागतात. त्याच सुमारास भारतावर मान्सून येतो. म्हणून एल-निनोचा प्रभाव मान्सूनवर पडू शकतो. भारतीय हवामान विभागामार्फत मान्सूनच्या अंदाजासाठी जे प्रमुख ६ घटक गृहीत धरले जातात़. त्यातील एल निनो हा एक प्रमुख घटक आहे.

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानTemperatureतापमान