शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

नियतकालिकांच्या मागणीला टपाल खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद; देशभरातील प्रकाशकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 15:22 IST

नियतकालिकांचे काम नेहमीच पुढच्या दोन महिन्यांपर्यंतचे तयार असते.

ठळक मुद्देजून २०२० पर्यंत सर्व अंकांचे पोस्टींग सवलतीच्या दरात करण्यात येईल

पुणे: मराठी नियतकालिकांच्या संपादक-प्रकाशक असोसिएशनने केलेल्या मागणीला पोस्ट खात्याने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जून २०२० पर्यंत सर्व अंकांचे पोस्टींग सवलतीच्या दरात करण्यात येईल, असे टपाल खात्याने कळवले आहे.असोसिएशनचे अध्यक्ष भालचंद्र कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. आहे. कोरोना परिस्थितीत प्रचलित सर्व नियम बाजूला ठेवून जून २०२० पर्यंतच्या अंकांचे पोस्टींग सवलतीच्या दरात करावे अशी मागणी असोसिएशनने केली होती. याबाबतच्या आदेशांचे सविस्तर परिपत्रक  केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या पोस्टल विभागाचे उपमहासंचालक अदनान अहमद यांनी जारी केले आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील सर्व नियतकालिकांच्या प्रकाशकांना दिलासा मिळाला असल्याचे कुलकर्णी म्हणाले.नियतकालिकांचे काम नेहमीच पुढच्या दोन महिन्यांपर्यंतचे तयार असते. मात्र सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत सर्वत्र बंद असल्याने नियतकालिके छापणे व त्यांचे वितरण करणे शक्य होणार नाही. मात्र ठरलेल्या नियमानुसार पोस्टींग झाले नाही तर दंड लावला जातो. हा दंड लावू नये, त्याऐवजी लॉकडाऊन नंतरच्या कालावधीत हे अंक पोस्ट केले तरी त्यांना सवलत सुरू ठेवावी अशी संघटनेची मागणी होती. केंद्रीय टपाल खात्याच्या या परिपत्रकानुसार ती मान्य करण्यात आली आहे.  मार्च, एप्रिल व मे महिन्यांचे अंक जून पर्यंत पोस्टींग होणार नसले तरी कोणताही दंड लागणार लागणार नाही.मार्च पासूनचे सर्व अंक प्रकाशित केले नाही, त्यातील काही वगळल्यास किंवा आवश्यकतेनुसार जोड अंक प्रकाशित केल्यास ते सवलतीच्या दरात स्विकारले जातील. लॉकडाऊननंतरच्या कालावधीत जूनपर्यंत हव्या त्या तारखांना मागील छापलेले अंकांचे पोस्टींग करणे देखील शक्य होणार आहे. यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता लागणार नाही. त्याचबरोबर प्रकाशकांना नेमून दिलेल्या पोस्टाऐवजी सोयीच्या अन्य पोस्टातून देखील नियतकालिकांचे पोस्टींग करण्याची सवलत केंद्रीय टपाल खात्याने दिली असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली.   नियतकालिकांच्या प्रचलित पोस्टींगनियमांना जूनपर्यंत पूर्णपणे स्थगिती देण्यात आली असल्याने प्रकाशकांच्या सर्व मागण्यांची दखल केंर्द्र सरकारने घेतल्याने केंद्रीय दळणवळण मंत्री  रवीशंकर प्रसाद व केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री ना. प्रकाश जावडेकर यांचे असोसिएशनच्या वतीनेआभार व्यक्त करण्यात आले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकारPost Officeपोस्ट ऑफिसPrakash Javadekarप्रकाश जावडेकर