शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पूजा चव्हाण पडली, की कोणी ढकलले?, घटनेच्या वेळी पूजा नशेत असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 06:33 IST

Pooja Chavan suicide case: पूजा चव्हाण या २२ वर्षाच्या तरुणीचा रविवारी (दि. ७) इमारतीच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. ही हत्या की आत्महत्या यावरुन समाज माध्यमांमध्ये कॅबिनेट मंत्र्यांचा या घटनेशी संबंध असल्याची चर्चा चालू आहे.

पुणे : विदर्भातील कॅबिनेट मंत्र्यांचा संबंध जोडल्या गेलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने पत्र पाठवले आहे. या प्रकरणी तपासानंतर अहवाल पाठविणार असल्याचे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले. पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.पूजा चव्हाण या २२ वर्षाच्या तरुणीचा रविवारी (दि. ७) इमारतीच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. ही हत्या की आत्महत्या यावरुन समाज माध्यमांमध्ये कॅबिनेट मंत्र्यांचा या घटनेशी संबंध असल्याची चर्चा चालू आहे. या तरुणीचे काही कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यावरुन  पूजाने एका मंत्र्यांच्या दबावातून आत्महत्या केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव असून  पूजाच्या मोबाईल आणि  लॅपटॉपमधील अनेक गोष्टी दडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय भाजपाने व्यक्त केला आहे.पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले, राष्ट्रीय महिला आयोगाचे पत्र मिळाले असून सर्व अंगाने तपास सुरु आहे. तिचे कुटुंबीय गावी असून आमच्याकडे त्यांच्यापैकी कोणाचीही तक्रार आलेली नाही. घटनेवेळी उपस्थित असणारा तिचा चुलतभाऊ, मित्र व संबधितांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

भाड्याने घेतले होते घरपूजा चव्हाण राहात होती, ते घर तिने भाड्याने घेतले होते. गेल्या ८ दिवसांपूर्वीच पूजा तेथे राहण्यासाठी आले होते. या घराची पोलिसांनी तपासणी केली. तेव्हा घरात मद्याच्या ४ बाटल्या सापडल्याचा दावा केला जात आहे. त्यातील अडीच बाटल्या रिकाम्या होत्या. त्यावरुन घरातील व्यक्तींनी मद्य प्राशन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तांत्रिक अडचण वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड म्हणाले, पूजाचे पोस्टमार्टेम करण्यात आले आहे. तिच्या सोबत असलेल्या तिच्या चुलत भावाचे आणि मित्राचे जबाबही घेतले आहेत. तांत्रिक अडचणींमुळे यात गुन्हा नोंद करता येत नाही. मात्र या प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत आम्ही तपास करणार आहोत.

आयुक्तांना बोलावले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना शुक्रवारी रात्री मुंबईला तातडीने बोलावून घेत संपूर्ण माहिती घेतली आहे. पूजाने मद्य प्राशन केले होते. ती गॅलरीच्या कठड्यावर बसलेली होती, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले.

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी