Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अखेर ११ दिवसांनी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात; पण सस्पेन्स आणखी वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 12:19 PM2021-02-17T12:19:42+5:302021-02-17T12:20:14+5:30

Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात; चौकशी सुरू

Pooja Chavan Suicide Case Police starts inquiry of two persons but denies to disclose names | Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अखेर ११ दिवसांनी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात; पण सस्पेन्स आणखी वाढला

Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अखेर ११ दिवसांनी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात; पण सस्पेन्स आणखी वाढला

Next

पुणे: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वानवडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येणार आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाबद्दल या दोघांकडे नेमकी काय माहिती आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यूला ११ दिवस उलटले आहेत. मात्र पोलिसांच्या हाती ठोस असं काहीही लागलेलं नाही. त्यामुळे विरोधकांकडून ठाकरे सरकारवर टीका होत आहे. (Pooja Chavan Suicide Case Police starts inquiry)

भाजप नगरसेवक उलगडणार पूजा चव्हाणच्या मृत्यूचं गूढ?; प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार ठरणार

पूजा चव्हाण पुण्यात भाऊ विलास चव्हाण आणि अरुण राठोड यांच्यासोबत राहत होती. पूजा चव्हाणचा गॅलरीतून पडून मृत्यू झाला. त्यावेळी विलास आणि अरुण सदनिकेत होते. त्यांनी तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. पोलिसांनी या दोघांची व्यवस्थित चौकशी न केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यातच आज पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन जण कोण आहेत, याची माहिती गुप्त ठेवली आहे. त्यामुळे पोलिसांच्या ताब्यात असलेले दोघे, विलास आणि अरुणच आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

“संजय राठोडांचं नेतृत्व संपवण्याचं कटकारस्थान”; सरपंचाचा गंभीर आरोप, भाजपाचा राजीनामा

आम्हाला ज्यांच्या ज्यांच्यावर संशय आहे, अशा लोकांचा आम्ही तपास करू शकतो, असं पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे पोलिसांनी अटक केलेले नेमके कोण आहेत?, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यूला ११ दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप पोलिसांचे हात रिकामेच असल्यानं विरोधकांनी सरकारवर शरसंधान साधलं आहे. पूजाच्या मृत्यूचा वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Shiv Sena Leader Sanjay Rathod) यांच्याशी थेट संबंध आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राठोड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.



 संजय राठोडांवर कारवाई करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देणार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील वर्चस्वाला धक्का?

संजय राठोड समर्थनार्थ शिवसैनिकांचा मोर्चा
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण समोर करून वनमंत्री संजय राठोड यांना बदनाम केले जात असल्याचा आरोप यवतमाळ येथील शिवसैनिकांनी केला आहे, मंगळवारी नेर येथे शिवसैनिकांनी भाजपचा निषेध करत शहरातून महिला-पुरुषांच्या सहभागात मोर्चा आला. विविध प्रकारच्या घोषणा मोर्चेकरी देत होते. तहसील कार्यालयावर धडकलेल्या मोर्चेकरांनी प्रशासनाला निवेदन सादर केले. दिग्रस येथेही शिवसैनिकांनी मोर्चा काढला. शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(CM Uddhav Thackeray) पाठवण्यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले.

संजय राठोड मौन सोडणार?
पूजा चव्हाण आत्महत्येनंतर अज्ञातवासात असलेले मंत्री संजय राठोड हे येत्या गुरुवारी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडणार असल्याचं कळतंय, वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी हे गाव आहे. या ठिकाणी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत याच मंदिरात असतात. गुरुवारी या मंदिरात येऊनच धर्मगुरूंच्या साक्षीने संजय राठोड आपली बाजू मांडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  

कोण आहे पूजा चव्हाण?
पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती. परळीत तिचे आई-वडील राहतात. पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहेत, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती. फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते. ती अतिशय डॅशिंग होती. १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात इंग्लिश स्पिकिंगच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.
 

Read in English

Web Title: Pooja Chavan Suicide Case Police starts inquiry of two persons but denies to disclose names

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.