शहरं
Join us  
Trending Stories
1
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
2
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
3
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
4
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
5
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
6
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
8
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
9
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
10
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
11
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
12
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
13
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
14
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
15
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
16
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
17
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
18
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
19
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
20
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...

Pooja Chavan Suicide Case: भाजप नगरसेवक उलगडणार पूजा चव्हाणच्या मृत्यूचं गूढ?; प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 11:59 IST

Pooja Chavan Death Case bjp corportor key witness: शिवसेना नेते संजय राठोड नॉट रिचेबल; भाजपचा नगरसेवक पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार

पुणे: शिवसेनेचे नेते संजय राठोड (Shivsena Leader Sanjay Rathod) यांच्या अद्यापही नॉट रिचेबल आहेत. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात (Pooja Chavan Death Case) राठोड यांचं नाव पुढे आल्यापासून राठोड माध्यमांसमोर आलेले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला राठोड अनुपस्थित होते. आज कॅबिनेटची बैठक होत आहे. या बैठकीला तरी राठोड उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिला की नाही?; मातोश्रीवरुन आली महत्त्वाची माहितीपूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून भारतीय जनता पक्षानं ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांवर दबाव असल्याचा थेट आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदारांची केवळ जुजबी चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. विशेष म्हणजे महत्त्वाच्या साक्षीदारांपैकी एक जण भाजप नगरसेवक आहे. पण तेदेखील या प्रकरणावर भाष्य करण्यासाठी, माहिती देण्यासाठी पुढे आलेले नाहीत.आधी फाशी, मग चौकशी कशी?, वनमंत्री राठोड यांचा सेनेकडून बचाव; विरोधकांना संयमाचा सल्लापूजा चव्हाणनं आत्महत्या केली की भोवळ येऊन पडल्यानं तिचा मृत्यू झाला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. पूजा इमारतीमधून पडल्यावर तिथे चार जण उपस्थित होते. अरुण राठोड, विलास चव्हाण, भाजप नगरसेवक पूजाला घेऊन रुबी हॉल क्लिनिकमध्ये पोहोचले. त्यामुळे हे या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आहेत. मात्र पोलिसांनी अद्याप तरी त्यांची सखोल चौकशी केलेली नाही....म्हणून संजय राठोड माध्यमांसमोर येत नाहीत; संजय राऊतांनी सांगितलं नेमकं कारणभाजप नगरसेवक यांना पूजा चव्हाणबद्दलची माहिती मिळताच ते तिच्या इमारतीजवळ पोहोचले. त्यांनीच अरुण राठोडकडून ऑडिओ क्लिप्स मिळवल्या. मात्र, या प्रकरणातल्या चार महत्त्वाच्या साक्षीदारांची पोलिसांनी पुरेशी चौकशी झालेली नाही. अरुण राठोड आणि अनिल चव्हाण नेमके कुठे आहेत, याची माहिती पोलिसांकडे नाही. भाजप नगरसेवक देखील अद्याप माध्यमांसमोर आलेले नाहीत. भाजप नगरसेवक माध्यमांसमोर आल्यास अनेक महत्त्वाच्या बाबींचा उलगडा होऊ शकेल. पूजा चव्हाणच्या मृत्यूचं गूढ उकलण्यास त्यामुळे मदत होऊ शकते.

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणSanjay Rathodसंजय राठोडShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे