पोल - विदर्भ स्वतंत्र व्हावा का?

By Admin | Updated: May 12, 2016 04:50 IST2016-05-12T04:50:56+5:302016-05-12T04:50:56+5:30

आता निर्णायक लढा देण्याचा एल्गार केला असून, त्यानिमित्ताने संपूर्ण विदर्भ पिंजून काढला जात आहे.

Polls - Will Vidarbha be free? | पोल - विदर्भ स्वतंत्र व्हावा का?

पोल - विदर्भ स्वतंत्र व्हावा का?

ऑनलाइन लोकमत
स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी यासाठी आता निर्णायक लढा देण्याचा एल्गार केला असून, त्यानिमित्ताने संपूर्ण विदर्भ पिंजून काढला जात आहे. एक मे, या महाराष्ट्र दिनाच्या दिवशीही स्वतंत्र विदर्भवाद्यांनी एकत्र येऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
नितिन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीने दिलेले वेगळ्या विदर्भाचे आश्वासन पाळले पाहिजे असे अणे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. तसेच, हिवाळी अधिवेशनापर्यंत भाजपाने आपला शब्द पाळला नाही तर 1 जानेवारीपासून भाजपाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा अणेंनी दिला आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, स्वतंत्र विदर्भाबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे जाणुन घेण्यासाठी आम्ही हा पोल घेत आहोत. या पोलमध्ये विचारलेल्या प्रश्नांना दिलेल्या पर्यायांपैकी तुम्हाला पटणारा पर्याय निवडा, आणि मांडा तुमचं मत.

 

Web Title: Polls - Will Vidarbha be free?