शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विधानपरिषदेसाठी रंगणार सामना, महाआघाडी विरुद्ध भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 06:39 IST

Polls to 5 Maharashtra legislative seats to be held on December 1 : आघाडी एकत्रितपणे लढली तर भाजपसमोर मोठे आव्हान असेल. ही निवडणूक १ डिसेंबरला होणार आहे. 

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच आघाडी विरुद्ध भाजप असा सामना विधानपरिषदेच्या पाच जागांसाठीच्या निवडणुकीत रंगणार आहे. आघाडी एकत्रितपणे लढली तर भाजपसमोर मोठे आव्हान असेल. ही निवडणूक १ डिसेंबरला होणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडून गेले होते. त्यांनी साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील (राष्ट्रवादी) यांचा पराभव केला होता. चंद्रकांत पाटील गेल्यावर्षी  विधानसभेवर निवडून गेल्याने विधानपरिषदेची  जागा रिक्त आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गंगाधरराव फडणवीस, नितीन गडकरी अशा दिग्गजांनी येथून दीर्घकाळ प्रतिनिधीत्व केले. सध्याचे आमदार अनिल सोले हे भाजपचे नागपूरचे महापौरही राहिले आहेत. भाजप यावेळी कोणाला संधी देणार या बाबत उत्सुकता असेल. महाविकास आघाडीचा एकत्रित उमेदवारच भाजपसमोर आव्हान उभे करू शकेल. अमरावती शिक्षक मतदारसंघात गेल्यावेळी शिक्षक आघाडी श्रीकांत देशपांडे यांनी शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष अरुण शेळके यांचा पराभव केला होता. शेळके यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा होता.  यावेळी भाजप काय भूमिका घेणार व काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचा एकच उमेदवार असेल का या बाबत उत्सुकता राहील. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी भाजपचे शिरिष बोराळकर यांचा पराभव केला होता.  यावेळी राष्ट्रवादी-काँग्रेसला शिवसेनेची साथ मिळाली तर भाजपची वाट खडतर होऊ शकते. पुणे शिक्षक मतदारसंघात गेल्यावेळी महाराष्ट्र राज्य कृती समितीचे दत्तात्रय सावंत यांनी राज्य शिक्षक परिषदेचे भगवानराव साळुंके यांचा पराभव केला होता. सावंत यांना राष्ट्रवादीचा तर साळुंके यांना भाजपचा पाठिंबा होता.

असा असेल निवडणूक कार्यक्रम अधिसूचना व उमेदवारी अर्ज दाखल करणे    ५ नोव्हेंबर २०२० उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत    १२ नोव्हेंबरउमेदवारी अर्जांची छाननी    १३ नोव्हेंबरअर्ज माघार घेण्याची मुदत    १७ नोव्हेंबरमतदानाची तारीख व वेळ     १ डिसेंबर, स. ८ ते सायं. ५मतमोजणी व निकाल     ३ डिसेंबर

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकMaharashtraमहाराष्ट्र