शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
2
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
3
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
4
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
5
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
6
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
7
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
8
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
9
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
10
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
11
१८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक
12
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
14
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
15
विशेष लेख: आळशी मावशी ! केवळ कोंबडीमुळं बिबट्या बिघडला... इकडं धूर.. तिकडं जाळ
16
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
17
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
18
Tips: कामाच्या ठिकाणी होणारे मतभेद मिटवण्यासाठी ६ सोप्या टिप्स!
19
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
20
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
Daily Top 2Weekly Top 5

Politics: महायुतीसह मविआतही फूट! दोन्ही आघाड्यांमध्ये मित्रपक्षच विरोधात ठाकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 10:46 IST

Maharashtra Politics: भाजपला रोखण्यासाठी शिंदेसेना आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या जोरदार हालचाली, शरद पवारांकडून स्थानिकांना मोकळीक

यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्तारुढ महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष हे एकमेकांविरुद्ध लढणार असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. नगर परिषदांप्रमाणेच जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीतही हेच चित्र बघायला मिळेल, अशी स्थिती आहे. 

युती वा आघाडीचे अधिकार प्रत्येक पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवर दिल्याने प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक नेत्यांना पूर्ण मोकळीक मिळाली असून स्थानिक समीकरणांचा विचार करून निर्णय घेतले जात आहेत. स्थानिक पातळीवर भाजप बलाढ्य असेल तर त्याला रोखण्यासाठी शिंदेसेना आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या जोरदार हालचाली काही नगर परिषदांमध्ये होत आहेत.  

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील काही नगर परिषदा अशाही आहेत जिथे भाजपने मित्रपक्षांशी चर्चाच न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या मित्रपक्षांनी भाजपला रोखण्यासाठी कुठे उद्धव सेना तर कुठे शरद पवार गटाशी हातमिळवणी केली आहे. महायुतीत शक्यतो फाटाफूट होऊ नये यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. भाजपने आम्हाला अगदीच नगण्य जागा देऊ केल्या आहेत, त्यापेक्षा वेगळे लढलेले बरे, अशी भावना शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांनी वर कळविली आहे. 

महाविकास आघाडीचे चित्र

स्थानिक पातळीवर निर्णय घ्या पण भाजप किंवा शिंदेसेना आणि अजित पवार गटासोबत कुठेही युती करू नका, असे उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षजनांना बजावले आहे. काँग्रेसनेही भाजप व मित्रपक्षांसोबत जाऊ नका, असे स्पष्टपणे खाली सांगितले आहे. शरद पवार गटाने मात्र भाजप आणि मित्रपक्षांसोबत जायचेच नाही, असे बजावून सांगितलेले नाही. स्थानिक पातळीवर आम्ही मुभा दिली आहे, असे त्यांचे नेते सांगत आहेत.आमच्या पक्षात असा निर्णय झाला आहे की या निवडणुका आम्ही पक्ष म्हणून लढणार नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा; तो त्यांचा अधिकार आहे , असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी म्हटले.

दोन्ही पवार गट एकत्र

अजित पवार गटाने काही ठिकाणी शरद पवार गटासोबत आघाडी केल्याचे चित्र दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड नगर पंचायत निवडणुकीत दोघे एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे, शरद पवार गटाचे उमेदवार हे अजित पवार गटाच्या घड्याळ या चिन्हावर लढणार आहेत. आंबाजोगाई (जि.बीड) येथेही दोन्ही पक्ष एकत्र लढतील, अशी घोषणा अजित पवार गटाचे माजी नगराध्यक्ष पापा मोदी यांनी केली आहे. शिराळा आणि जत (जि. सांगली) येथे या दोन पक्षांनी एकत्र येत भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांना आव्हान दिले आहे. सातारा जिल्ह्यातील म्हसवड नगरपालिकेत भाजप विरोधात सर्व राजकीय पक्ष एकवटले आहेत. 

नातेवाईकांची गर्दी

भाजपचे मंत्री, आमदार यांनी अनेक ठिकाणी आपल्या जवळच्या नातेवाइकांना थेट नगराध्यक्षपदाची संधी मिळावी यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असून किमान डझनभर तरी असे उमेदवार आहेत. उमेदवार जाहीर झाल्यानंतर सर्वाधिक घराणेशाही ही भाजपमध्ये दिसेल. विदर्भात ही संख्या सर्वात जास्त असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Cracks in alliances: Allies clash in Maharashtra local body polls.

Web Summary : Maharashtra's ruling and opposition alliances face internal strife as coalition partners contest against each other in local elections. Local leaders prioritize regional equations, leading to unexpected alliances. Both Pawar factions unite in some areas.
टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र