शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

सावज चालून आले आणि मोठी शिकार साधली गेली..! शिवसेनेसोबतच वैचारिक मतभेद आणि शत्रुत्वही वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 12:42 IST

अध्यक्षांच्या दालनात काय घडले, हे सभागृहात सांगण्याची परंपरा नाही. त्यामुळे तिकडे काय घडले हे सभागृहात कोणी बोलणार नाही या समजुतीत भाजप नेते राहिले.

अतुल कुलकर्णी -मुंबई : सावज टप्प्यात येईपर्यंत शिकार करायची नाही, असे सुधाकरराव नाईक म्हणायचे. मात्र, सोमवारी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या टप्प्यात आयतेच सावज चालून आले आणि भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाची शिकार त्यांना साधता आली. या एकाच घटनेमुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्षांनी खूप काही साध्य केले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सरकार राहील की जाईल, या प्रश्नाला आता आमदारांचे निलंबन मागे घेईपर्यंत तरी पूर्णविराम लागला आहे.  अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारची मोठी राजकीय सरशी झाली.या सगळ्यात पडद्याआड अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी कळीची भूमिका निभावली. इम्पिरिकल डाटा’ केंद्राने त्वरित द्यावा, असा ठराव तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी विधानसभेत मंजूर केला. गदारोळात सभागृहाचे कामकाज तहकूब झाले. त्यानंतर जाधव उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात गेले. त्या वेळी ते दोघेच तेथे होते. मात्र, अचानक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तेथे आले. त्यांच्या पाठोपाठ गिरीश महाजन, संजय कुटे, आशीष शेलार व अन्य दोन आमदारही गेले. फडणवीस गुस्स्यातच होते. त्यांना आलेला राग पाहून भाजपच्या आमदारांनाही चेव चढला. त्यातच शिवसेनेचे अकोले बाळापूरचे आमदार नितीन देशमुख आत आले. त्यांच्यात आणि गिरीश महाजन यांच्यात हातापाई झाली. मंत्री गुलाबराव पाटील, आ. दिलीप बनकर, आ. सुहास कांदे हेही आत घुसले. आत गेलेल्यांनी दालनाचे दार आतून बंद केले. वाद वाढत गेला. आवाज चढत गेले. त्याचवेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील बाहेरून दार ठोठावत होते. पाच ते सात मिनिटांनी दार उघडले गेले तेव्हा आतमध्ये चुकीचे घडल्याचे आशीष शेलार यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ भास्कर जाधव यांची माफी मागितली. पण जाधव यांनी आधी लाथा मारता आणि नंतर माफी का मागता, असे सुनावले. तर मंत्री नवाब मलिक मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेले. आपण आता गप्प बसलो तर ही मारामारी रस्त्यांवर सुरू होईल. तातडीने निलंबन केले पाहिजे, असा सूर त्यांनी लावला. संसदीय कार्यमंत्री अनिल परब स्वत: सचिव राजेंद्र भागवत यांच्या दालनात गेले. तेथे गोंधळ करणाऱ्या आमदारांची यादी तयार केली गेली. ती घेऊन परब धावतच मुख्यमंत्र्यांकडे गेले. अध्यक्षांच्या दालनात काय घडले, हे सभागृहात सांगण्याची परंपरा नाही. त्यामुळे तिकडे काय घडले हे सभागृहात कोणी बोलणार नाही या समजुतीत भाजप नेते राहिले. मात्र मलिक यांनी ते सभागृहाला कळाले पाहिजे असे सांगून घटनाक्रम ‘रेकॉर्डवर’ आणण्याचा सल्ला दिला. त्याला सरकारमधील ज्येष्ठ नेत्यांनी दुजोरा दिला व पुन्हा तालिका अध्यक्ष म्हणून जाधव सभागृहात आले.  अध्यक्षांनी आपबीती सांगितली पाहिजे, अशी मागणी मलिक यांनी केली. जाधव यांनी अध्यक्षांच्या आसनावरून घटनाक्रम सांगितला. हे असे विधानसभेत पहिल्यांदा घडले. यात भाजपची रणनीती फसली. फडणवीस यांनी विधानसभेतही, ‘एक दोन लोकांचे शब्द चांगले नव्हते, त्याबद्दल आम्ही माफीही मागितली’ असे सांगून घडला प्रकार मान्यच केला.दरवेळी भाजप आक्रमक होते आणि आपण ‘बॅकफूट’वर जातो. आतासुद्धा कारवाई केली नाही तर काम करणे अवघड होईल, अशी चर्चा तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये झाली. दोनच दिवसांपूर्वी फडणवीस यांनी आमचे शिवसेनेशी शत्रुत्व नाही, पण वैचारिक मतभेद आहेत, असे सांगितले होते पण आजच्या घटनेने शत्रुत्व आणि वैचारिक मतभेदांची दरी दोन्हीत वाढ झाल्याचे दिसले.

या घटनेचा महाविकास आघाडीला फायदा -

- शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या घटनेने आणखी जवळ आली. सरकारच्या स्थिरतेचा प्रश्न दूर झाला.- १२ आमदारांचे निलंबन रद्द करायचे असेल तर सत्ताधाऱ्यांची ‘बार्गेनिंग’ ताकद वाढली.- या घटनेने भाजपचे संख्याबळ १०६ वरून ९४ झाले आहे. २८८ सदस्य संख्या असणाऱ्या विधानसभेत काँग्रेसच्या एका आमदाराचे निधन झाले आहे. आता बहुमत सिद्ध करण्यासाठी १३८ आमदारांची गरज आहे. अशा स्थितीत शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५३ आणि काँग्रेस ४३ असे एकूण १५२ सदस्य सभागृहात आहेत. शिवाय अन्य ९ सदस्य सरकार सोबत आहेत. त्यामुळे सरकार राहणार की जाणार, या चर्चेला काही काळ तरी विराम मिळाला आहे.    - ओबीसींचा इम्पिरिकल डाटा केंद्राकडून मागवण्याच्या विषयावर एवढा राडा झाला. त्यामुळे भाजप केंद्राच्या बाजूने व ओबीसींच्या विरोधी आहे, असे म्हणायला सत्ताधारी मोकळे झाले.-त्यातच मराठा आरक्षणाचा ठराव सभागृहात मंत्री अशोक चव्हाण मांडत असताना त्यावर बोलण्याची संधी गमावून भाजपने मराठा समाजाच्या बाजूने बोलण्याचीही संधी गमावली.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवनBJPभाजपाShiv Senaशिवसेना