शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

मेमनच्या कबरीवरून राजकारण तापले; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 08:59 IST

मुंबई पोलिसांच्या पथकाने मरिन लाइन्सच्या बडा कब्रस्तानमध्ये जाऊन या कबरीभोवती लावण्यात आलेले एलईडी लाइट काढले.

मुंबई : मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आल्याची बाब समोर आल्यानंतर या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या सुशोभिकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त निलोत्पल हे या प्रकरणाचा तपास करणार आहेत.मुंबई पोलिसांच्या पथकाने मरिन लाइन्सच्या बडा कब्रस्तानमध्ये जाऊन या कबरीभोवती लावण्यात आलेले एलईडी लाइट काढले. या सुशोभिकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांना दिली. या सुशोभिकरणाची परवानगी कोणी दिली होती, केव्हा दिली होती याचीही चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचा मुद्दा उपस्थित करून भाजप धार्मिक वातावरण बिघडवत आहे. दहशतवादी अफजल गुरू आणि मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला फाशी दिल्यानंतर त्यांना अज्ञातस्थळी दफन केले. अतिरेक्यांचे समाजात उदात्तीकरण होऊ नये म्हणून काँग्रेसने खबरदारी घेतली होती. याकूबबाबत ही खबरदारी तत्कालीन भाजप सरकारने घेतली नाही.- अतुल लोंढे, प्रवक्ता, प्रदेश काँग्रेस

महाविकास आघाडी सरकारच्या काळात देशद्रोही याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आले. हेच तुमचे मुंबईवरचे प्रेम का? या कृत्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात असताना हे सुशोभीकरण झाले.- राम कदम, आमदार, भाजप

दहशतवाद्यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देत नाहीत. हा सरकारचा नियम आहे. पण भाजप सरकारने याकूब मेमनचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात का दिला? याकूब मेमनच्या कबरीचा आणि पालिकेचा काहीही संबंध नाही. ती जागा खासगी ट्रस्टची आहे. याकूबची अंत्ययात्रा अन् अंत्यसंस्काराची परवानगी भाजपचे सरकार असताना दिली गेली.- आदित्य ठाकरे, युवा सेनाप्रमुख

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसterroristदहशतवादीBJPभाजपाShiv Senaशिवसेना