‘एफटीआय’ आंदोलनामागे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2015 00:49 IST2015-08-19T00:49:57+5:302015-08-19T00:49:57+5:30
पुण्यातील फिल्म अॅन्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्युट आॅफ इंडिया (एफटीआय) ही जागतिक स्वरूपाची कला क्षेत्राशी निगडीत संस्था आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदाच्या

‘एफटीआय’ आंदोलनामागे राजकारण
जळगाव : पुण्यातील फिल्म अॅन्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्युट आॅफ इंडिया (एफटीआय) ही जागतिक स्वरूपाची कला क्षेत्राशी निगडीत संस्था आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून गेले काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र यात विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण केले जात आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. ग्रामीण भाागातील विद्यार्थ्यालाही या संस्थेत संधी मिळावी, म्हणून या संस्थेचे उपकेंद्र सुरू करणे विचाराधीन असल्याचे मत एफटीआयचे सदस्य तथा मुंबई येथील एस. के. सोमय्या कॉलेजचे प्राचार्य नरेंद्र पाठक यांनी व्यक्त केले.
प्राचार्य पाठक हे मूळचे अमळनेरचे आहेत. निवडीनंतर ते अमळनेरमध्ये आले होते.