शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

"राज्यात लवकरच राजकीय स्फोट होणार, राष्ट्रवादीत धुसफूस हेच कारण"

By नितीन चौधरी | Updated: September 24, 2022 18:46 IST

बारामतीत राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडून दाखवू...

पुणे :अजित पवार यांना गृहमंत्रीपद हवे होते त्यांची तशी योग्यता होती मात्र शिवसेना व काँग्रेसने तसे होऊ दिले नाही. राष्ट्रवादीत धुसफूस असून या निमित्ताने ती उघड झाली आहे. त्यामुळे काही दिवसांनी राज्यात राजकीय स्फोट होईल असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, "अजित पवार बोलले ते खरेच आहे. मात्र, त्यांच्या सहयोगी पक्षांनी तसे होऊ दिले नाही. ते गृहमंत्री झाले असते तर प्रगती झाली असती. तसे न झाल्याने अडीच वर्षांत राज्य मागे पडले. राष्ट्रवादीत धुसफूस आहे हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. मी मागेही याबाबत बोललो होते. ते खरे ठरले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात मोठा राजकीय स्फोट होऊ शकतो." अजित पवार देवेंद्र फडणवीस पुणे एकत्र येतील का प्रश्नावर मात्र याविषयी त्यांनाच विचारा असे सांगून उत्तर देण्याचे टाळले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बारामती येथील दौऱ्याबाबत ते म्हणाले, "येत्या निवडणुकीत जनता काय ठरवेल ते मान्य असेल मात्र आम्ही पूर्ण जोर लावून बारामतीत राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडून दाखवू. ते बंद पडावे या साठी आमचे प्रयत्न आहेत." पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदीची मागणीपुण्यात पी एफ आय च्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्या, हे देशद्रोही आहे, अशा संघटना देशात राज्यात नकोत. त्यामुळे भाजप या संघटनेवर बंदी घालावी अशी मागणी करेल असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. 

एकनाथ खडसे भाजपात येणार का?

एकनाथ खडसे भाजपमध्ये येण्याची चिन्हे आहेत का याबाबत मला प्रदेशाध्यक्ष म्हणून मला काहीही माहिती नाही. तसा कोणताही प्रस्ताव नाही, ते अमित शहा यांना भेटले, काय बोलले मला माहित आम्ही पण ते भाजपमध्ये येतील ही चर्चा निरर्थक आहे. मात्र, राजकारणात काय होईल ते सांगता येत नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेnirmala sitharamanनिर्मला सीतारामनeknath khadseएकनाथ खडसेAjit Pawarअजित पवार