पोलिसाची महिलेस बेदम मारहाण

By Admin | Updated: February 27, 2017 03:30 IST2017-02-27T03:30:30+5:302017-02-27T03:30:30+5:30

५० वर्षीय नीना पाटणकर यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका पोलिसाने शुल्लक कारणावरून शनिवारी बेदम मारहाण केली.

Police woman suffocated | पोलिसाची महिलेस बेदम मारहाण

पोलिसाची महिलेस बेदम मारहाण


कल्याण : काटेमानिवलीतील पंचवटी चाळीत राहणाऱ्या ५० वर्षीय नीना पाटणकर यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका पोलिसाने शुल्लक कारणावरून शनिवारी बेदम मारहाण केली. मारहाण करणाऱ्या पोलिसाचे नाव गणेश आव्हाड असे आहे. त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी नीना यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, त्याच्याविरोधात तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करीत केवळ अदखल पात्र गुन्हा नोंदवला.
मारहाण करणारा आव्हाड हा उल्हासनगर हद्दीतील पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. आव्हाड हा नीना यांच्या घराशेजारी राहतो. तो त्याची गाडी नीना यांच्या घरासमोर उभा करतो. त्यामुळे त्यास नीना यांनी मज्जाव केला असता या गोष्टीचा राग मनात धरून आव्हाडने त्यांना बेदम मारहाण केली.
नीना यांना दोन विवाहित मुले, सुना व नातवंडे आहेत. मुले व सुना कामावर गेल्या असताना आव्हाड याने नीना यांना बेदम मारहाण केली. नीना यांना झालेली मारहाण ही गंभीर स्वरूपाची आहे. असे असताना मारहाण करणारा पोलीस असल्याने त्याच्याविरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप नीना यांनी केला आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावी, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Police woman suffocated