पोलिसांची व्हॅन फोडली, दोघांना अटक

By Admin | Updated: June 20, 2016 15:26 IST2016-06-20T15:26:48+5:302016-06-20T15:26:48+5:30

दारू पिऊन वाहन चालविण्याच्या (ड्रंक आणि ड्राईव्ह) आरोपात कारवाई केली म्हणून दोघांनी पोलिसांच्या गस्ती वाहनाची काच फोडली.

Police van destroyed, both arrested | पोलिसांची व्हॅन फोडली, दोघांना अटक

पोलिसांची व्हॅन फोडली, दोघांना अटक

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 20 - दारू पिऊन वाहन चालविण्याच्या (ड्रंक आणि ड्राईव्ह) आरोपात कारवाई केली म्हणून दोघांनी पोलिसांच्या गस्ती वाहनाची काच फोडली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या आवारात रविवारी दुपारी ११.३० ते १२ च्या सुमारास ही घटना घडली. आकाश राजकुमार मेश्राम (वय २५, रा. वरपाखड भीम चौक) आणि अमोल पांडुरंग मोरे (वय २२, रा. नागार्जुन कॉलोनी, जरीपटका) अशी आरोपींची नावे आहेत.
सहाय्यक फौजदार मधुकर तांडेकर हे शनिवारी दुपारी इंदोरा चौका कर्तव्यावर असताना त्यांना आरोपी मेश्राम एका मोटारसायकल ट्रिपल सिट येताना दिसला. त्यामुळे त्याला थांबवून तांडेकर यांनी दुचाकीची कागदपत्रे मागितली. कागदपत्रे तपासत असताना एक जण निघून गेला. मात्र, दारूच्या नशेत असलेल्या मेश्राम आणि मोरेने वाद घालून तांडेकर यांना शिवीगाळ केली. त्यामुळे या दोघांना जरीपटका ठाण्यात नेण्यात आले. तेथे पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या गस्ती वाहनाची काच आरोपींनी फोडली. त्यामुळे या दोघांना सरकारी कामात अडथळा निर्माण करून तोडफोड करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली.

Web Title: Police van destroyed, both arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.