पोलीस उपनिरीक्षकाला अटक

By Admin | Updated: April 28, 2016 02:51 IST2016-04-28T02:51:50+5:302016-04-28T02:51:50+5:30

साकीनाका पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याला बुधवारी साकीनाका पोलिसांकडून अटक करण्यात आली.

Police sub-inspector arrested | पोलीस उपनिरीक्षकाला अटक

पोलीस उपनिरीक्षकाला अटक

मुंबई : साकीनाका पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याला बुधवारी साकीनाका पोलिसांकडून अटक करण्यात आली. एका विवाहितेवर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर असून अधिक चौकशी सुरू आहे.
संदीप चव्हाण या पोलिसाचे नाव आहे. तो साकीनाका पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. यातील पीडित महिला देखील साकीनाका म्हाडा परिसरात मुलगी आणि पतीसोबत राहते. नायगाव पोलीस वसाहतीत राहणाऱ्या आणि २०११-१२ च्या बॅचच्या चव्हाणची ओळख या महिलेशी तीन वर्षांपूर्वी झाली. ही महिला काही कामानिमित्त पोलीस ठाण्यात आली होती. या महिलेचा पती घरी नसताना चव्हाण तिला भेटायचा. तीन वर्षे हे दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. चव्हाणने पत्नीला सोडून आपल्याशी लग्न करावे, असा तगादा तिने चव्हाणच्या मागे लावला होता. नकार दिल्यामुळे तिने पोलिसात तक्रार दिली.

Web Title: Police sub-inspector arrested