पोलीस भरतीची लेखी परीक्षा

By Admin | Updated: June 13, 2014 01:34 IST2014-06-13T01:34:30+5:302014-06-13T01:34:30+5:30

नवी मुंबई पोलिस भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा आज नेरुळ येथे झाली. २८४ पोलिस भरतीसाठी ही निवड प्रक्रीया होत आहे.

Police recruitment written examination | पोलीस भरतीची लेखी परीक्षा

पोलीस भरतीची लेखी परीक्षा

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिस भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा आज नेरुळ येथे झाली. २८४ पोलिस भरतीसाठी ही निवड प्रक्रीया होत आहे. त्यानुसार नेरूळच्या डीवायपाटील स्टेडियम येथे त्यांची लेखी परीक्षा झाली.
राज्यात सर्वच ठिकाणी सध्या पोलिस भरती प्रक्रीया सुरु आहे. त्यानुसार नवी मुंबई पोलिस दलात देखील २८४ जणांची भरती केली जाणार आहे. याकरीता गेले काही दिवस उमेदवारांची मैदानी चाचणी सुरु होती. या चाचणीच्या निकालानंतर आज पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा नेरुळच्या डीवाय पाटील स्टेडीयम येथे झाली. या परीक्षेसाठी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर ही परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी त्या ठिकाणी नवी मुंबई पोलिसांतर्फे विश्ोष नियोजन करण्यात आले होते. या लेखी परीक्षेच्या निकालात भावी पोलिस निवडले जाणार आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवारांचे या निकालाकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Police recruitment written examination