यापुढे पोलीस भरती हिवाळ्यात

By Admin | Updated: June 16, 2014 20:03 IST2014-06-16T20:03:57+5:302014-06-16T20:03:57+5:30

पोलीस भरतीच्या वेळी शारिरीक ताण सहन न झाल्याने चार उमेदवार मृत्युमुखी पडलेल्या घटनेची दखल घेत यापुढे पाच किलोमीटरच्या धावण्याची अट रद्द करण्यात येईल तसेच

Police recruitment in winter | यापुढे पोलीस भरती हिवाळ्यात

यापुढे पोलीस भरती हिवाळ्यात

>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १६ - पोलीस भरतीच्या वेळी शारिरीक ताण सहन न झाल्याने चार उमेदवार मृत्युमुखी पडलेल्या घटनेची दखल घेत यापुढे पाच किलोमीटरच्या धावण्याची अट रद्द करण्यात येईल तसेच पोलीस भरतीची प्रक्रिया उन्हाळ्यात न करता हिवाळ्यात करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री आ. आर. पाटील यांनी दिली. पोलीस भरतीत झालेल्या उमेदवारांच्या दुर्दैवी मृत्यूंची चौकशी करण्यात येईल तसेच त्यात दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असेही पाटील म्हणाले.

Web Title: Police recruitment in winter