शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...  
2
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
3
सामाजिक कार्यकर्त्याची पत्नीकडूनच हत्या; रात्री २.३० च्या सुमारास..., चिंचवड हादरले
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा; म्हणाले, 'सहा महिन्यांत परिणाम कळेल!'
5
बदलणार पेमेंटची पद्धत! म्युच्युअल फंडमधून थेट UPI पेमेंट करा; काय आहे ‘Pay with Mutual Fund’ फीचर?
6
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
7
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
8
प्रसिद्ध गायक सचिनला अटक! लग्नाचं आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप
9
KVP Investment Scheme: पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम
10
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
11
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
12
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
13
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
14
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
15
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
16
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
17
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
18
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
19
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
20
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर

"राज्यात पोलीस भरती होणार, पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 13:49 IST

Anil Deshmukh : नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषेदेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख बोलत होते. 

ठळक मुद्दे२६ जानेवारी पासून येरवडा कारागृहात जेल टुरिझम सुरू करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकारांना दिली.

नागपूर : मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली असली तरी राज्यात पोलीस भरती होईल. तसेच, पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु झाली आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते. 

मराठा आरक्षणामुळे पोलीस भरती प्रक्रियेला थोडा विलंब झाला. पण, याबाबत आम्ही मराठा नेत्यांशी चर्चा असून त्यांना राज्यात पोलीस भरती होणे आवश्यक असल्याचे सांगितले. ही गोष्ट त्यांनाही पटल्यामुळे मराठा नेत्यांनी पोलीस भरती प्रक्रियेला सहमती दर्शविली दिली आहे. त्यामुळे आता पोलीस भरतीची पुढील प्रक्रिया योग्यरित्या पार पडेल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

याचबरोबर, पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर उर्वरित जागांची भरती दुसऱ्या टप्प्यात होईल, असे अनिल देशमुख म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी 2538 जागांची  भरती झाल्यानंतर पुन्हा गरज पडल्यास आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असेही अनिल देशमुख यांनी म्हटले होते.

'येरवडा कारागृहात जेल टुरिझम सुरू करणार'२६ जानेवारी पासून येरवडा कारागृहात जेल टुरिझम सुरू करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकारांना दिली. भारतातील पर्यटनाचा हा पहिला उपक्रम असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पुण्यातील येरवडा कारागृहात २६ जानेवारीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन होणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

...म्हणून मराठा संघटना आक्रमक झाल्या होत्याराज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी ‘एसईबीसी’चे आरक्षण न ठेवता राज्याच्या गृह विभागाकडून निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे मराठा संघटना आक्रमक झाल्या होत्या. एसईबीसी आरक्षण न देता पोलीस भरती प्रक्रिया राबवली तर मराठा समाजाकडून उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा संघटनांकडून देण्यात आला होता. 

टॅग्स :PoliceपोलिसAnil Deshmukhअनिल देशमुखMaharashtraमहाराष्ट्र