पोलीस भरतीची उद्या लेखी परीक्षा
By Admin | Updated: June 9, 2016 03:32 IST2016-06-09T03:32:16+5:302016-06-09T03:32:16+5:30
पोलीस आयुक्तालयाअंतर्गत सुरू असलेल्या पोलीस भरतीची लेखी परीक्षा शुक्रवारी घेतली जाणार आहे.

पोलीस भरतीची उद्या लेखी परीक्षा
नवी मुंबई : पोलीस आयुक्तालयाअंतर्गत सुरू असलेल्या पोलीस भरतीची लेखी परीक्षा शुक्रवारी घेतली जाणार आहे. नेरुळ येथील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये सकाळी ९ वाजता या परीक्षेला सुरवात होणार आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व तळोजा कारागृहाकरिता एप्रिल महिन्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरवात झाली होती. प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात कागदपत्रे व शारिरीक चाचणीमध्ये १४ हजार ३३ अर्जदारांपैकी ७ हजार ७३१ उमेदवार पात्र ठरले होते. त्यांची सुमारे महिनाभर मैदानी चाचणी सुरु होती. यामध्ये २ हजार ३४० उमेदवार पुढील प्रक्रियेला पात्र ठरले आहेत. या पात्र उमेदवारांना अनेक दिवसांपासून भरतीच्या अंतिम टप्प्याच्या लेखी परीक्षेची उत्सुकता लागली होती. अखेर १० जून रोजी सकाळी ९ वाजता नेरुळच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर ही लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)