पोलीस कर्मचाऱ्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न

By Admin | Updated: September 2, 2016 16:39 IST2016-09-02T16:39:27+5:302016-09-02T16:39:27+5:30

बॅरेकेटिंग असताना गाडी सोडल्याची विचारणा करून पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत त्याच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना धडगाव तालुक्यात घडली

Police personnel tried to attack a knife | पोलीस कर्मचाऱ्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न

पोलीस कर्मचाऱ्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न

>- ऑनलाइन लोकमत
धडगावातील घटना : मुंबई घटनेची पुनरावृत्ती टळली
नंदुरबार, दि. 2 - बॅरेकेटिंग असताना गाडी सोडल्याची विचारणा करून पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत त्याच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना धडगाव तालुक्यात घडली. संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मुंबई येथील हवालदार शिंदे यांना मारहाण झाल्याने त्यांच्या मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच धडगाव तालुक्यात देखील त्या घटनेची पुनरावृत्ती होताहोता टळली. धडगाव पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले आसिफ गफार शहा हे धडगाव तालुक्यातील मणवाळी गावात ड्युटीवर होते. त्या ठिकाणी लोखंडी बॅरेकेंटींग करण्यात आली आहे. शहा यांनी एक गाडी सोडली. ती गाडी का सोडली याचा जाब विचारण्यासाठी रायसिंग राज्या पाडवी (२४) रा.कोठार, ता.तळोदा हा त्यांच्याजवळ गेला. दोघांमध्ये वाद झाला. त्याचा राग येवून रायसिंग पाडवी याने बॅरेकेटींग तोडून फेकून दिले. तसेच शहा यांची कॉलर पकडून ढकलून दिले. त्यामुळे त्यांच्या मानेला दुखापत झाली. शिवाय खिशातून चाकू काढून मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद पोलीस कर्मचारी आसिफ शहा यांनी दिली आहे. त्यावरून रायसिंग पाडवी विरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार अडकमोल पुढील तपास करत आहेत.
 

Web Title: Police personnel tried to attack a knife