जालन्यात पोलीस अधिका-याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
By Admin | Updated: September 17, 2016 08:48 IST2016-09-17T08:48:57+5:302016-09-17T08:48:57+5:30
पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर पठाडे यांनी ड्युटीवर असताना रात्री स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. घटनास्थवरुन सुसाईड नोट सापडली आहे

जालन्यात पोलीस अधिका-याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
जालना, दि. 17 - तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर पठाडे यांनी ड्युटीवर असताना रात्री स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. घटनास्थवरुन सुसाईड नोट सापडली आहे. सुसाईड नोटमधून आत्महत्येचं नेमकं कारण समजण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप कारण कळू शकलेलं नाही.
प्रभाकर पठाडे पोलीस अधीक्षक कार्यालयातल्या नियंत्रण कक्षात ड्युटी करत होते. त्याचवेळी रात्री त्यांनी स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.