पॅरोलवर बाहेर पडलेल्या ‘डॅडी’वर पोलिसांची नजर

By Admin | Updated: October 26, 2016 03:20 IST2016-10-26T03:20:11+5:302016-10-26T03:20:11+5:30

दगडी चाळीमध्ये छापा टाकून अनिल पिसाळ (४६) याला ११ लाखांच्या रोख रकमेसह ताब्यात घेतल्यानंतर, या प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये गँगस्टर अरुण गवळी उर्फ डॅडी

Police look out on 'Daddy' who is out on parole | पॅरोलवर बाहेर पडलेल्या ‘डॅडी’वर पोलिसांची नजर

पॅरोलवर बाहेर पडलेल्या ‘डॅडी’वर पोलिसांची नजर

मुंबई : दगडी चाळीमध्ये छापा टाकून अनिल पिसाळ (४६) याला ११ लाखांच्या रोख रकमेसह ताब्यात घेतल्यानंतर, या प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये गँगस्टर अरुण गवळी उर्फ डॅडी पोलिसांच्या रडारवर आला आहे. गुन्ह्याच्या तपासामध्ये गवळीकडेही चौकशी करण्यात येणार असल्याच्या वृत्ताला, मुंबई पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.
गवळी टोळीसाठी काम करणाऱ्या पिसाळ याने ही टोळी सोडल्यानंतर, दादर परिसरात भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. आरोपीला भादंवि ४१ ड कलमान्वये अटक करण्यात आल्याचे, पोलीस उपायुक्त प्रवीण पडवळ यांनी सांगितले.
गवळी टोळीसाठी काम करणारा आरोपीविरोधात मारहाण, दंगल आणि अपहरणाचे चार गंभीर गुन्हे त्याच्याविरोधात दाखल आहेत. गवळी पॅरोलवर घरी आल्यानंतर
ही रोकड आणली गेल्याने, पोलिसांनी या दिशेने तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Police look out on 'Daddy' who is out on parole