वडाळा येथील अवैध धंद्यावर पोलीसाची धाड, दोन लाखांच्या मुद्देमालासह दहा जण अटकेत

By Admin | Updated: August 14, 2016 10:04 IST2016-08-14T10:04:13+5:302016-08-14T10:04:13+5:30

सोलापूर तालुका पोलीस ठाणेच्या हद्दीत वडाळा येथे मटका बुक्कीवर छापा टाकून 2,00,000 रु चा मुद्देमालासह दहा जणना पोलीसानी ताब्यात घेतले आहे.

Police inspector arrested for robbery in Wadala | वडाळा येथील अवैध धंद्यावर पोलीसाची धाड, दोन लाखांच्या मुद्देमालासह दहा जण अटकेत

वडाळा येथील अवैध धंद्यावर पोलीसाची धाड, दोन लाखांच्या मुद्देमालासह दहा जण अटकेत

>सोलापूर -  सोलापूर तालुका पोलीस ठाणेच्या हद्दीत वडाळा  येथे मटका बुक्कीवर छापा टाकून 2,00,000 रु चा मुद्देमालासह दहा जणना पोलीसानी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रविवारी पहाटे सहाच्या सुमारास ग्रामीण पोलीसाच्या विशेष पथकाने केली.
या कारवाईत  विश्वास ज्ञानदेव साठे, सतिश राजेंद्र शिंदे,  नामदेव दत्तात्रय लामकाने,  दत्तात्रय तुकाराम विर,  आकाश विष्णू साठे, सुनिल सुधाकर फंड, अंकुश रामचंद्र भालेकर सर्व रा वडाळा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला . 
 तसेच जयदीपराजे हॉटेल येथे सुमारे 70,000 रु किंमतीचे देशी विदेशी दारूच्या  बाटल्या अवैद्य रित्या विक्रीसाठी ठेवलेल्या पकडल्या असून सदर दारू साठा ठेवणार हॉटेल मालक दिनेश साठे (रा वडाळा ता उत्तर सोलापूर) व मॅनेजर महमद शेख  याच्या विरुध्द सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रसंगी मा. पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदशनाखाली विशेष पथकातील पोलीस उपअधीक्षक  समिरसिंह साळवे, स.पो.नि प्रकाश वाघमारे, पोना अमृत खेडकर, मिलींद कांबळे, अंकूश मोरे, पो का अभिजीत ठाणेकर , बाळराजे घाडगे, सुरेश लामजाने, आमोल माने, नितीन चव्हाण, महादेव लोंढे यांच्या  टिमने हे काम केले .

Web Title: Police inspector arrested for robbery in Wadala