‘पोलीस-डॉक्टरांत समन्वय हवा’
By Admin | Updated: February 29, 2016 00:50 IST2016-02-29T00:50:16+5:302016-02-29T00:50:16+5:30
कोणताही गुन्हा घडल्यास त्याचा योग्य तपास होण्यामध्ये वैद्यकीय अहवालाची भूमिका महत्त्वाची असते. यासाठी पोलीस आणि डॉक्टरांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे.

‘पोलीस-डॉक्टरांत समन्वय हवा’
पुणे : कोणताही गुन्हा घडल्यास त्याचा योग्य तपास होण्यामध्ये वैद्यकीय अहवालाची भूमिका महत्त्वाची असते. यासाठी पोलीस आणि डॉक्टरांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे.
या आधारेच कोणत्याही गुन्ह्याच्या तपासाला योग्य दिशा व गती मिळण्याचे काम होते, असे मत पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केले. बी. जे. मेडिकल वैद्यकीय महाविद्यालयात ‘डॉक्टर आणि पोलिसांचा समन्वय’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या.
जगभरातील संशोधनाची माहिती संशोधकांना व्हावी, या हेतूने बी. जे. मेडिकल वैद्यकीय महाविद्यालयात तीन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन केले आहे. (प्रतिनिधी)