बलात्कार प्रकरणी दोघांना १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

By Admin | Updated: July 13, 2017 03:31 IST2017-07-13T03:31:24+5:302017-07-13T03:31:24+5:30

गेली सहा महिने बलात्कार करणाऱ्यास आणि त्याला मदत करणाऱ्या अशा दोघांना सोमवारी अटक करण्यात आली.

Police custody till July 15 in connection with the rape case | बलात्कार प्रकरणी दोघांना १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

बलात्कार प्रकरणी दोघांना १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : एका वीस वर्षीय तरु णीशी मैत्री करून, त्याचा गैरफायदा घेत तिच्यावर गेली सहा महिने बलात्कार करणाऱ्यास आणि त्याला मदत करणाऱ्या अशा दोघांना सोमवारी अटक करण्यात आली. या दोघांना१५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या प्रकरणी शहरातील शंतनू लक्ष्मण निंबाळकर आणि त्याचा चुलत भाऊ अमोल रामदास निंबाळकर या दोघा भावांना शहर पोलिसांनी नाते खिंड येथील त्यांच्या घरातून अटक केली होती. या पीडित तरुणीशी त्यांची मैत्री होती. मात्र, मैत्रीचा गैरफायदा घेत शंतनूने तिला जानेवारी महिन्यात शहरालगतच्या महामार्गावरील कपिल पॅलेस हॉटेलमधील एका रूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिला वारंवार ब्लॅकमेल करीत तिला धमकावत होता व तिच्यावर अत्याचार करीत होता. यामुळे त्रस्त झालेल्या पीडित तरुणीने शहर पोलीस ठाण्यात निंबाळकर बंधूंच्या विरोधात तक्र ार दाखल केली. या गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली आलिशान चारचाकी गाडी देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी डीवायएसपी प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. रवींद्र शिंदे, उपनिरीक्षक पंकज गिरी पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Police custody till July 15 in connection with the rape case