जमीन व्यवहारात फसवणूक प्रकरणी पोलिस कोठडी
By Admin | Updated: May 10, 2014 20:41 IST2014-05-10T19:41:36+5:302014-05-10T20:41:45+5:30
पेरणे येथील जमिनीचा दोनदा व्यवहार करून ९ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसंानी एकाला अटक केली.

जमीन व्यवहारात फसवणूक प्रकरणी पोलिस कोठडी
पुणे : पेरणे येथील जमिनीचा दोनदा व्यवहार करून ९ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसंानी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला १२ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
बाळु शिवराम वारघडे ( रा. मु. पो. कोरेगाव भिमा ता. शिरूर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अब्दुल अजीज ननवा शेख (६९ रा. मॅजेस्टिक इरा सोसायटी, नानापेठ) यंानी फिर्याद दिली. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता दुय्यम निबंधक कार्यालय येथे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी फसवणूक केलेली रक्कम हस्तगत करायची आहे. फसवणूक केलेल्या रक्कमेची कोठे गुंतवणूक केली आहे काय, आणखी कोण साथीदार आहेत का याचा तपास करायचा आहे. तपासासाठी सरकारी वकीलांनी आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी केली.