चाकूने हल्ला करणार्याला पोलिस कोठडी
By Admin | Updated: May 10, 2014 20:32 IST2014-05-10T19:41:40+5:302014-05-10T20:32:46+5:30
किरकोळ वादातून पत्नीवर चाकूने हल्ला करणार्या आकेश शांताराम भिंगारे (३६ रा. उरवडे आंबेगाव, ता. मुळशी जि. पुणे) याला मार्केटयार्ड पोलिसंानी अटक केली.

चाकूने हल्ला करणार्याला पोलिस कोठडी
पुणे : किरकोळ वादातून पत्नीवर चाकूने हल्ला करणार्या आकेश शांताराम भिंगारे (३६ रा. उरवडे आंबेगाव, ता. मुळशी जि. पुणे) याला मार्केटयार्ड पोलिसंानी अटक केली. न्यायालयाने त्याला दि. १२ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी मार्केटयार्ड आंबेडकरनगर येथे घडला. याप्रकरणी रूपाली आकेश भिंगारे (२५) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. तपासासाठी सरकारी वकील राजकुमार माचेवार यांनी आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी केली.