पोलीस शिपायाचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र !
By Admin | Updated: September 9, 2014 05:12 IST2014-09-09T05:12:43+5:302014-09-09T05:12:43+5:30
पोलिसांवर होणार्या आर्थिक अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी एका पोलीस शिपायाने थेट राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच पत्र लिहून आपली वेदना व्यक्त केली आहे.

पोलीस शिपायाचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र !
यवतमाळ : पोलिसांवर होणार्या आर्थिक अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी एका पोलीस शिपायाने थेट राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच पत्र लिहून आपली वेदना व्यक्त केली आहे.
निसार अब्दूल शेख (ब.नं. ६८७) असे या पोलीस शिपायाचे नाव असून ते सध्या ठाणे पोलीस आयुक्तालयातील भिवंडी नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत. शिक्षक व महसूल खात्याच्या धर्तीवर पोलिसांचीही सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करावी, साप्ताहिक सुटी बंद असल्यास त्याचा मोबदला म्हणून किमान एक दिवसाचे वेतन मिळावे, अशी मागणी या पोलीस शिपायाने १ सप्टेंबर २0१४ रोजी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या पत्रात नमूद केली आहे. पोलिसांना नेहमीच सण-उत्सव, निवडणुका, मोर्चे, आंदोलने, व्हीआयपी सुरक्षा यानिमित्त सातत्याने बंदोबस्त करावा लागतो.