वरळी, सांताक्रूझमध्ये पोलिसांवर हल्ला
By Admin | Updated: June 7, 2017 05:50 IST2017-06-07T05:50:34+5:302017-06-07T05:50:34+5:30
दोन दुचाकीस्वारांनी कर्तव्यावर असलेल्या पोलिसावर हल्ला चढविल्याची घटना दादर आणि सांताक्रुझमध्ये समोर आली.

वरळी, सांताक्रूझमध्ये पोलिसांवर हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नाकाबंदी दरम्यान हटकल्याच्या रागात दोन दुचाकीस्वारांनी कर्तव्यावर असलेल्या पोलिसावर हल्ला चढविल्याची घटना दादर आणि सांताक्रुझमध्ये समोर आली. याप्रकरणी दादर पोलिसांनी दोघांना तर सांताक्रूझ पोलिसांनी एकाला सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अटक केली आहे.
वरळी बीडीडी चाळ येथील भागोजी वाघमारे मार्गावर विलास शेटगे नाकाबंदीसाठी तैनात होते. सोमवारी रात्री साईनाथ दत्तात्रय पाटील (२२), किसन धनाजी निपानी (१९) हे दोघ दारुच्या नशेत दुचाकीवरुन जात होते. शेटगेंनी दोघांना हटकले. याच रागात त्यांनी दुचाकी त्यांच्या अंगावर चढवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. रविवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक वसीम शेख हे त्यांच्या पथकासह सांताक्रूझ येथे गस्त घालत होते. यावेळी तेथून बाईकवरुन जाणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र ते दोघेही तेथून पळू लागले. यावेळी वसीम शेख यांनी पाठलाग करुन गायकवाड आणि हेमंतला ताब्यात घेतले. तेव्हा हेमंतने चाकूने त्यांच्यावर हल्ला केला.