शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

रविकांत तुपकरांना पोलिसांनी केली अटक; सोयाबीन-कापूस आंदोलन पेटण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 17:28 IST

२० नोव्हेंबरला बुलढाण्यात रविकांत तुपकरांनी एल्गार महामोर्चा झाला होता. जिल्हाभरातून हजारो शेतकरी बुलढाण्यात धडकले होते.

बुलढाणा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना शनिवारी बुलढाणा पोलिसांनी अटक केली. तुपकर यांच्या चिखली रोडवरील राहत्या घरून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तुपकारांच्या अटकेनंतर जिल्ह्यात सोयाबीन कापसाचे आंदोलन आता पेटण्याची शक्यता आहे. 

२० नोव्हेंबरला बुलढाण्यात रविकांत तुपकरांनी एल्गार महामोर्चा झाला होता. जिल्हाभरातून हजारो शेतकरी बुलढाण्यात धडकले होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार झाला नाही तर २८ नोव्हेंबरला मुंबईला धडक देऊन २९ नोव्हेंबरला मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा तुपकर यांनी दिला होता. याबाबत शुक्रवारी तुपकरांना पोलिसांनी नोटीस बजावली होती परंतु अशा नोटिशींना आपण भीक घालत नाही असे तुपकर म्हणाले होते. 

दरम्यान शनिवारी सकाळी तुपकरांच्या अटकेची पूर्वतयारी पोलिसांनी केली. बुलढाणा शहर पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त आधी निवासस्थानी तैनात केला. त्यानंतर दुपारच्या सुमारास तुपकर यांना ताब्यात घेण्यात आले. बुलढाणा शहरात ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेकडे शेतकऱ्यांसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

कार्यकर्ते आक्रमकरविकांत तुपकर यांना अटक केल्याचे कळताच त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सोयाबीन कापसाला हमी भाव मिळावा. राज्यात दुष्काळ जाहीर करावा यासाठी तुपकरांनी एल्गार मोर्चा काढला होता. परंतु सरकार सकारात्मक प्रतिसाद देत नाही. आज खोके सरकारानं पोलिसांच्या माध्यमातून या तुपकरांना अटक केली. जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही आणि तुपकरांची सुटका सरकारने केली नाही तर उद्यापासून आम्ही मंत्र्यांच्या गाड्या जाळू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथडे यांनी दिला आहे. दुसरीकडे तुपकरांना अटक केली म्हणून कार्यकर्त्यांनी चिखली तालुक्यातील जालना-खामगाव महामार्गावर टायर जाळून सरकारचा निषेध केला.  

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाFarmerशेतकरी