पोळ, मांढरेवर खुनांचे दोषारोपपत्र दाखल

By Admin | Updated: January 24, 2017 03:47 IST2017-01-24T03:47:18+5:302017-01-24T03:47:18+5:30

वाई हत्याकांड प्रकरणातील आरोपी संतोष पोळ आणि ज्योती मांढरेवर सोमवारी वाई न्यायालयात तीन खुनांचे दोषारोपपत्र दाखल

Pole, murder charges and murder charges | पोळ, मांढरेवर खुनांचे दोषारोपपत्र दाखल

पोळ, मांढरेवर खुनांचे दोषारोपपत्र दाखल

वाई (जि. सातारा) : वाई हत्याकांड प्रकरणातील आरोपी संतोष पोळ आणि ज्योती मांढरेवर सोमवारी वाई न्यायालयात तीन खुनांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयीन कामासाठी संतोष पोळ आणि ज्योती मांढरेला न्यायालयात आणण्यात आले होते.
हत्याकांडातील सहापैकी तीन खुनांचे दोषारोपपत्र यापूर्वीच दाखल करण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका मंगल जेधे खूनप्रकरणी पोलिसांनी संतोष पोळ व त्याची मैत्रीण ज्योती मांढरेला ताब्यात घेतले होते़
पोलिस तपासात संतोष पोळने मंगल जेधेसह सहा खून केल्याचे सांगितले होते़ त्याने मंगल जेधेसह नथमल भंडारी, सलमा शेख, जगाबाई पोळ, वनिता चिकणे, सुरेखा गायकवाड यांचा खून केल्याचे कबूल करून मृतदेहाचे सांगाडे काढून दिले होते़ खूनप्रकरणातील सर्व दोषारोपपत्र दाखल झाल्याने यापुढील सुनावणी सातारा जिल्हा न्यायालयात मुख्य न्यायाधीश डी. डब्लू. देशपांडे यांच्यासमोर ४ फेबु्रवारीला होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pole, murder charges and murder charges