शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

पराभवाच्या भितीने घाबरलेले पंतप्रधान मोदी वाट्टेल ते खोटं नाटं बोलत आहेत; काँग्रेसची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 18:12 IST

Congress vs PM Modi: नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखली नाही, असेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई म्हणाले

भाजपा लोकसभेची निवडणूक हरणार याची खात्री झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि त्यांचे लोक खोटं नाटं लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष तुमच्या खिशातून पैसे काढून मुसलमानांना वाटणार आहे. तुमचे दाग-दागिने त्यांना वाटणार आहे. जे लोक घुसखोरी करतात आहेत त्यांच्यासाठी हे सगळं केले जाते. घुसखोरीविरोधात काँग्रेसने जितकी कठोर भूमिका घेतली आणि जितक्या लोकांना शिक्षा केल्या, तसं भाजपच्या काळात काहीच झालेलं नाही. सबंध हिमालयामध्ये चीन ज्या पद्धतीने घुसला आहे त्याबद्दल काहीच करायचं नाही, काहीच बोलायचं नाही आणि सतत कॉंग्रेसवर आरोप करायचे ही मोदींची कार्यपद्धती आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे.  

नरेंद्र मोदी दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देणार होते. त्याबद्दल ते आज काहीच बोलत नाही. गेल्या १० वर्षात २० कोटी रोजगार देणे तर दूरच नोटाबंदी आणि कोरोनामध्ये लावलेल्या लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोकांच्या असलेल्या नोक-या गेल्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, असे मोदींनी आश्वासन दिले होते. त्याच्या संबंधात काहीच न करता शेतकऱ्यांना गोळ्या घालण्याचे काम मोदीजींनी केलं आहे. त्यांच्याकडे लोकांना सांगण्यासारखं काहीच नाही म्हणून हिंदू-मुसलमान वाद घडवून आणतात. गल्लीबोळातील संघाचे कार्यकर्ते जसे बोलतात तसे प्रधानमंत्री बोलत आहेत. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे.

काँग्रेसमुळे दलित, आदिवासी ओबीसी समाजासाठी राखीव जागा निर्माण केल्या गेल्या. त्यासाठी घटनेमध्ये व्यवस्था केली. मागासलेपण असलेल्या समाजाला इतर समाजाप्रमाणे बरोबरीच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. सामाजिक समानता निर्माण व्हावी म्हणून ‘समान संधीसाठी ‘विशेष संधी’ हे तत्त्व स्वीकारले’. याउलट रा.स्व.संघ नेहमीच आरक्षणाला विरोध करत आला आहे. “भारतीय घटना म्हणजे वेगवेगळ्या देशाच्या घटनेतील कायदे उचलून बनवलेली ‘गोधडी’ आहे”. असे माजी संघ प्रमुख श्री. गोळवलकर सतत म्हणायचे. याची आठवण हुसेन दलवाई यांनी आपल्या पत्रकात करून दिली आहे.

आज मुसलमानांना धर्माच्या अनुषंगाने आरक्षण दिले जाणार असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. मुसलमानांमध्ये सुद्धा मागासलेले लोक आहेत, दलित, आदिवासी, ओबीसी, जाती आहेत. धर्म बदलला म्हणून जात बदलत नाही हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. मुस्लिम समाजाला आरक्षण धर्माच्या अनुषंगाने नव्हे तर त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावरच द्यावे ही मागणी आहे. इतकेच नव्हे तर मा. मुंबई उच्च न्यायालयानेही मुस्लिम समाजात सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण आहे म्हणून त्यांना शिक्षण क्षेत्रात आरक्षण द्यावे अशी शिफारस केली आहे. असे असतानाही मागासलेल्या समाजातील लोकांना इतर समाजाबरोबर आणण्याचा प्रयत्न केला तर मोदीजी, तुमच्या पोटात का दुखतं? असा सवाल दलवाई यांनी उपस्थित केला आहे. मोदीजी, आपण आर.एस.एस. चे प्रचारक नाहीयेत. तुम्ही या देशाचे ‘प्रधानमंत्री’ आहात. थोडी तरी याची तमा बाळगा. प्रधानमंत्री पदाची गरिमा तुम्ही खाली आणत आहात, ही चांगली गोष्ट नाही. अशा तीव्र शब्दात दलवाईनी आपला संताप व्यक्त केला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४prime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसHussein Dalwaiहुसेन दलवाई