शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"शिवसेना संपवण्यासाठी पंतप्रधान मोदींना येण्याची गरज नाही, संजय राऊत पुरेसे" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 15:22 IST

संजय राऊतांमुळे अनेक आमच्याकडे येतील आणि काही शिंदेंकडे जातील असा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून संजय राऊतांनी राज्य सरकार तसेच भाजपावर प्रहार केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना संपवण्यासाठी पंतप्रधान मोदींना येण्याची गरज नाही. आमच्यासारखे कार्यकर्ते आहे. संजय राऊतसुद्धा पुरेसे आहेत असा चिमटा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना काढला आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शिवसेना संपवण्यासाठी मोदींना मुंबईत येण्याची गरज नाही. आम्ही छोटे कार्यकर्तेच पुरेसे आहोत. त्यांच्याकडील राहिलेले आमदार, खासदारच पुढील काळात आमच्याकडे येतील. संजय राऊतांमुळे अनेक आमच्याकडे येतील आणि काही शिंदेंकडे जातील. संजय राऊतच शिवसेना संपवण्यासाठी पुरेसे आहेत. उद्धव ठाकरेंना पक्षाचे आमदार स्वत:ला सांभाळायला येत नाही ते मित्रपक्षांना कसे सांभाळतील. पक्षाचे लोक तुम्हाला सोडून जातात दुसरे तुमच्याकडे का येतील? असा सवाल त्यांनी विचारला. 

उद्धव ठाकरेंवरही टीकास्त्रउद्धव ठाकरे केवळ निवडणुकीपुरतं जवळ येतील आणि त्यानंतर दूर जातील हे प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत. स्वार्थासाठी उद्धव ठाकरे  काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित आलेत. भाजपा-शिंदे गट आणि अजून कुणी पक्ष आमच्यासोबत येतील त्यांना योग्यप्रकारे न्याय देणे, सन्मान देणे हे एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांना जमते. ते उद्धव ठाकरेंना जमत नाही. ते कधीच युतीला न्याय देऊ शकत नाहीत असं बावनकुळे यांनी सांगितले. 

काय म्हणाले होते संजय राऊत?पंतप्रधान काही तासांसाठी मुंबईत येणार आहेत. पंतप्रधानाच्या दौऱ्याची तारीख विनंती करून बदलता आली असती. मात्र शिवसेनेचा पराभव करणे आणि मुंबई महापालिका निवडणुका हेच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचे लक्ष्य आहे. पंतप्रधानांना विनंती केली असती तर त्यांनी तारीख पुढे ढकलली असती. देशातील सर्व राज्याचे प्रतिनिधी दावोसला चालले आहेत आणि आमचे सरकार दौरा रद्द करत आहे त्यामुळे महाराष्ट्राचं सरकार गुंतवणुकीबाबत गंभीर नाही असं त्यांनी म्हटलं.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा