औरंगाबादेच्या भाजीमंडीत चोहोबाजूंनी आवक वाढल्याने पालेभाज्यांचा सुकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:38 IST2018-12-10T13:32:50+5:302018-12-10T13:38:35+5:30
भाजीपाला : शेतकऱ्यांनी रबी पिकाकडे लक्ष न देता भाजीपाला व फळभाज्यांकडे अधिक लक्ष दिले आहे.

औरंगाबादेच्या भाजीमंडीत चोहोबाजूंनी आवक वाढल्याने पालेभाज्यांचा सुकाळ
औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी रबी पिकाकडे लक्ष न देता भाजीपाला व फळभाज्यांकडे अधिक लक्ष दिले आहे. परिणामी, चोहोबाजूंनी आवक वाढून भाजीमंडीत भाज्यांचा सुकाळ निर्माण झाला आहे.
अडत बाजारात राज्यातून, तसेच परराज्यातून दररोज ८०० टनापेक्षा अधिक भाज्यांची आवक होत आहे. पालेभाज्यांमध्ये मेथी २०० ते २५० रुपये शेकडा, पालक ९० ते ११० रुपये शेकडा, कोथिंबीर ६० ते १२० रुपये शेकडा विकली. ठिकठिकाणच्या भाजीमंडीत या पालेभाज्या ५ रुपये गड्डी विकली जात आहे. कांदा ११० ते ७०० रुपये क्विंटलदरम्यान विकत आहे. किरकोळ विक्रीत १० ते १२ रुपये प्रतिकिलो मिळत आहे.
जुना बटाटा विक्रीसाठी येत अूसन ५०० ते ७०० रुपये क्विंटलने विकला जात आहे. नवीन मटार २००० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल, फुलकोबी अवघी २०० ते ३०० रुपये क्विंटलने तर पत्ताकोबी ५०० ते ९०० रुपये क्विंटलने विक्री झाली.