एलबीटी नोंदणी करून सहकार्य करावे

By Admin | Updated: January 21, 2017 03:30 IST2017-01-21T03:30:27+5:302017-01-21T03:30:27+5:30

पनवेल महानगरपालिका हद्दीत १ जानेवारीपासून स्थानिक संस्था कर (एल.बी.टी.) लागू झाला आहे.

Please help by registering LBT | एलबीटी नोंदणी करून सहकार्य करावे

एलबीटी नोंदणी करून सहकार्य करावे


पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीत १ जानेवारीपासून स्थानिक संस्था कर (एल.बी.टी.) लागू झाला आहे. त्यासाठी नोंदणी करून व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी पनवेल येथे शुक्रवारी व्यापाऱ्यांना याबाबत माहिती देताना केले. ही बैठक शांततेत पार पडली.
पनवेल येथील क्र ांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात एल.बी.टी बाबत मार्गदर्शन करण्यासाठी व्यापाऱ्यांची १० जानेवारी रोजी बोलवलेली बैठक शिवसैनिकांनी शहर प्रमुख प्रथमेश सोमण यांच्या नेतृत्वाखाली उधळवून लावली होती. त्यामुळे पालिकेने शुक्र वारी २० जानेवारी रोजी पुन्हा बैठक बोलावली होती. या बैठकीला उपायुक्त मंगेश चितळे, कल्याण - डोंबिवली पालिकेचे एल.बी.टी. पहाणारे बागुल व कुळकर्णी हे अधिकारी उपस्थित होते.
कल्याण - डोंबिवली पालिकेचे एल.बी.टी संबंधी अधिकारी बागुल यांनी ज्यांची वार्षिक उलाढाल २०१५-१६ किं वा चालू आर्थिक वर्षात ५० कोटीपेक्षा जास्त आहे त्यांना पालिकेकडे एल.बी.टी.साठी नोंदणी करणे आवश्यक असल्याचे संगितले. महिना संपल्यापासून २० दिवसात कर भरला नाही तर महिना २ टक्के व्याज भरावे लागेल अशी माहिती दिली. जो माल महापालिका हद्दीत खरेदी करून आणला जाईल त्याच्या बिलाच्या रक्कमेवर एल.बी.टी. भरावा लागेल. दारू दुकानांना उलाढाल कितीही असली तरी नोंदणी व कर भरावा लागेल. यावेळी त्यांनी नोंदणी रद्द करणे, बदल करणे व कर मिळणाऱ्या परताव्यासंबंधी माहिती दिली. यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी जानेवारीपासून कर लागू झाल्याने उलाढालीचे आर्थिक वर्ष कसे धरणार कर कोणत्या उलाढालीवर भरावा लागणार याबाबत व्यापऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.
>महापालिका क्षेत्राचा विकास व सोयी-सुविधा मिळण्याच्या दृष्टीने एल.बी.टी. महत्वाचा आहे. काही महिन्यांचा प्रश्न आहे. १ जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. त्यावेळी महापालिकेला दिली जाणारी भरपाई या भरलेल्या करावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करून योग्य कर भरावा.
- डॉ. सुधाकर शिंदे, आयुक्त,
पनवेल शहर महानगरपालिका

Web Title: Please help by registering LBT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.